Corona World Update: सुमारे 25 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, सक्रिय रुग्णांची टक्केवारी 50.69 पर्यंत खाली

Corona World Update: About 25 lakh patients overcome corona, percentage of active patients down to 50.69 per cent

एमपीसी न्यूज – जगातील एकूण कोरोना संसर्ग 57 लाख 92 हजार 179 व्यक्तींपर्यंत वाढला असून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 24 लाख 98 हजार 707 म्हणजे जवळजवळ 25 लाख झाली आहे.  कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 43.14 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मृत आणि बरे झालेले रुग्ण यांना वगळून आता जगात सुमारे 29 लाख 36 हजार कोरोना रुग्ण उरले आहेत. जगातील हे सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण आता 50.69 टक्क्यांपर्यंत कमी आले आहे, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 57 लाख 92 हजार 179 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 57 हजार 467 (6.17 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 24 लाख 98 हजार 707 (43.14 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 29 लाख 36 हजार 005 (50.69 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 28 लाख 83 हजार 031 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 52 हजार 974 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

21 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 934

22 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 252

23 मे – नवे रुग्ण 99 हजार 938 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 183

24 मे – नवे रुग्ण 96 हजार 505 दिवसभरातील मृतांची संख्या 2 हजार 826

25 मे – नवे रुग्ण 89 हजार 756 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 096

26 मे – नवे रुग्ण 92 हजार 060 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 048

27 मे – नवे रुग्ण 1 लाख 06 हजार 475 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 283

अमेरिकेत मंगळवारी 1535 कोरोना बळी

अमेरिकेत बुधवारी 1,535 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1,02,107 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 17 लाख 45 हजार 803 झाली आहे तर 4 लाख 90 हजार 130 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

ब्राझीलने ओलांडला कोरोनाबाधितांचा चार लाखांचा टप्पा

ब्राझीलमध्ये बुधवारी 1,148 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलने मृतांचा 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 25 हजार 697 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संख्येने काल चार लाखांचा टप्पा ओलांडला. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 14 हजार 661 झाली आहे तर 1 लाख 66 हजार 647जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मेक्सिकोमध्ये काल (बुधवारी) 501, इंग्लंडमध्ये 412, पेरूमध्ये 195 तर भारतात 190 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. रशियामध्ये 161, कॅनडा 126, इटली 117, स्वीडन 95, इक्वाडोर 72, फ्रान्स 66, इराणमध्ये 56 तर इंडोनेशियात 55 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 17,45,803 (+20,546), मृत 1,02,107 (+1,535)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 4,14,661 (+22,301), मृत 25,697 (+1,148)
  3. रशिया – कोरोनाबाधित 3,70,680 (+8,338), मृत 3,968 (+161)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 2,83,849 (+510), मृत 27,118 (+1)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,67,240 (+2,013), मृत 37,460 (+412)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,31,139 (+584), मृत 33,072 (+117)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,82,913 (+191), मृत 28,596 (+66)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,81,895 (+607), मृत 8,533 (+35)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,59,797 (+1,035), मृत 4,431 (+34)
  10. भारत – कोरोनाबाधित 1,58,086 (+7,293) , मृत 4,534 (+190)
  11. इराण – कोरोनाबाधित 1,41,591 (+2,080), मृत 7,564 (+56)
  12. पेरू –  कोरोनाबाधित 1,35,905 (+6,154) , मृत 3,983 (+195)
  13. कॅनडा –  कोरोनाबाधित 87,519 (+872), मृत 6,765 (+126)
  14. चीन – कोरोनाबाधित 82,993 (+1), मृत 4,634 (+0)
  15. चिली – कोरोनाबाधित 82,289 (+4,328), मृत 841 (+35)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 78,541 (+1,815) मृत 425 (+14)
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 74,560 (+3,455), मृत 8,134 (+501)
  18. पाकिस्तान – कोरोनाबाधित 59,151 (+1,446), मृत 1,225 (+28)
  19. बेल्जियम – कोरोनाबाधित 57,592 (+137), मृत 9,364 (+30)
  20. कतार – कोरोनाबाधित 48,947 (+1,740), मृत 30 (+2)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.