Corona World Update: अमेरिका, ब्राझील पाठोपाठ भारतातील कोरोना बळींचा आकड्याने ओलांडला एक लाखाचा टप्पा

कोरोनामुक्तांचे प्रमाण 74.35 टक्के, मृत्यूदर 2.97 टक्के तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 22.69 टक्के

एमपीसी न्यूज – अमेरिका, ब्राझील पाठोपाठ भारतातील कोरोना बळींचा आकड्याने ओलांडला एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन कोटी 48 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत दोन कोटी 58 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल मृत्यूदरात किंचित घट झाली असली तरी कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी होऊन सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे पहायला मिळत आहे. जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 74.35 टक्के झाले आहे. मृत्यूदर 2.97 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण सुमारे 22.69 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 48 लाख 30 हजार 981 झाली असून आतापर्यंत एकूण 10 लाख 33 हजार 234 (2.97 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 58 हजार 95 हजार 299 (74.35 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 79 लाख 02 हजार 448 (22.69 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 78 लाख 36 हजार 123 (99.16 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 66,325 (0.84 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

आतापर्यंत अमेरिकेत 2 लाख 13 हजार 524 तर ब्राझीलमध्ये 1 लाख 45 हजार 431 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाबळींची संख्या 1 लाख 875 वर जाऊन पोहचली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असणारा भारत कोरोना बळींच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

24 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 14 हजार 855, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 48 हजार 373, मृत्यू 5 हजार 872

25 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 18 हजार 804, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 49 हजार 323, मृत्यू 5 हजार 818

26 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 94 हजार 650, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 34 हजार 123, मृत्यू 5 हजार 306

27 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 51 हजार 915, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 27 हजार 194, मृत्यू 3 हजार 873

28 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 30 हजार 547, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 40 हजार 785, मृत्यू 3 हजार 837

29 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 88 हजार 185, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 66 हजार 414, मृत्यू 5 हजार 846

30 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 13 हजार 858, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 82 हजार 684, मृत्यू 6 हजार 209

1 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 19 हजार 406, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 39 हजार 272, मृत्यू 8 हजार 922

2 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 16 हजार 256, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 24 हजार 867, मृत्यू 5 हजार 603

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.