Corona World Update: तब्बल 45 लाख रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई, 52.63 टक्के रुग्ण कोरोनामुक्त

Corona World Update: As many as 45 lakh patients won the battle of Corona, 52.63 per cent patients were corona free एकूण 86 लाखांपैकी 45 लाख रुग्णांची कोरोनावर मात, अजूनही 36 लाख सक्रिय रुग्ण बाकी

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 86 लाखांच्या जवळपास गेला असला तरी त्यापैकी 45 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आणखी वाढून 52.62 टक्के झाली आहे. आता जगात सुमारे 36 लाख सक्रिय कोरोनाबाधित उरले आहेत. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.31 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 42.07 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 85 लाख 70 हजार 384 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 55 हजार 575 (5.31 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 45 लाख 09 हजार 468 (52.62 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 36 लाख 05 हजार 341 (42.07 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 35 लाख 40 हजार 302 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 54 हजार 561 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

8 जून – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 270,  कोरोनामुक्त 75 हजार 280, मृतांची संख्या 3 हजार 157

9 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 071,  कोरोनामुक्त 66 हजार 534, मृतांची संख्या 4 हजार 732

10 जून – नवे रुग्ण 1 लाख 34 हजार 705,  कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 298, मृतांची संख्या 5 हजार 165

11 जून – नवे रुग्ण 1 लाख 36 हजार 757,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 127, मृतांची संख्या 4 हजार 951

12 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 917,  कोरोनामुक्त 86 हजार 241, मृतांची संख्या 4 हजार 603

13 जून – नवे रुग्ण 1 लाख 33 हजार 292,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 371, मृतांची संख्या 4 हजार 229

14 जून – नवे रुग्ण 1 लाख 23 हजार 783,  कोरोनामुक्त 71 हजार 423, मृतांची संख्या 3 हजार 258

15 जून – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 600,  कोरोनामुक्त 90 हजार 756, मृतांची संख्या 3 हजार 415

16 जून – नवे रुग्ण 1 लाख 42 हजार 557,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 806 , मृतांची संख्या 6 हजार 592

17 जून – नवे रुग्ण 1 लाख 41 हजार 872 ,  कोरोनामुक्त 1 लाख 08 हजार 580, मृतांची संख्या 5 हजार 264

18 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 528 ,  कोरोनामुक्त 96 हजार 845 , मृतांची संख्या 5 हजार 123

अमेरिकेतील मृतांचा आकडा 1 लाख 20 हजारच्या पुढे

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (गुरुवारी) 27 हजार 924 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 63 हजार 651 झाली आहे. गुरुवारी 747 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 20 हजार 688 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 9 लाख 30 हजार 994 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 12 लाख 11 हजार 969 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये एका दिवसात 1204 कोरोना बळी 

ब्राझीलमध्ये गुरुवारी 1,204 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 47 हजार 869 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 9 लाख 83 हजार 359 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 5 लाख 03 हजार 507 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 31 हजार 983 आहे.

मेक्सिकोत गुरुवारी 707 कोरोना बळी

मेक्सिकोत गुरुवारी एका दिवसात 707 कोरोना बळींची नोंद झाली आहे. भारतात 342, चिलीमध्ये 226, पेरूमध्ये 204, रशियात 182 तर इंग्लंडमध्ये 135 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानमध्ये 118, इजिप्त 88, इराणमध्ये 87, कोलंबिया 86, इराक 83, इक्वाडोरमध्ये 80, इटलीत 66, दक्षिण अफ्रिका व इंडोनेशियात प्रत्येकी 63 बळी गेले आहेत.

पाकिस्तान 13 व्या तर बांगलादेश 17 व्या स्थानावर तर चीन टॉप 20 मधून बाहेर

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत मेक्सिको व फ्रान्सला मागे टाकत पाकिस्तान 13 व्या स्थानावर जाऊन पोहचला आहे, कॅनडाला मागे टाकत बांगलादेश 17 व्या स्थानावर पोहचला आहे. सुरुवातीला पहिल्या क्रमांकावर असणारा चीन आता 21 व्या क्रमांकावर गेला आहे. म्हणजेच आता चीन ‘टॉप 20’ यादीतून बाहेर गेला आहे. इराण व जर्मनीला मागे टाकत चीन नवव्या स्थानावर पोहचला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविल्याने जर्मनी आता 11 व्या, फ्रान्स 15 व्या तर कॅनडा 18 व्या स्थानावर आहे.

इंग्लंडने ओलांडला कोरोनाबाधितांचा तीन लाखांचा टप्पा

इंग्लंडने कोरोनाबाधितांचा तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तीन लाखपेक्षा अधिक कोरोनाबाधित असणारे केवळ पाच देश आहेत. चार देशांमध्ये दोन लाख ते तीन लाखांच्या दरम्यान कोरोनासंसर्ग झालेला आहे. तर नऊ देशांमध्ये एक लाख ते दोन लाखांच्या दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या आहे. बांगलादेश आणि कॅनडा या दोन देशांनी गुरुवारी कोरोनाबाधितांच्या संख्येचा एक लाखांचा टप्पा ओलांडला.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 22,63,651 (+27,924), मृत 1,20,688 (+747)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 9,83,359 (+23,050), मृत 47,869 (+1,204)
  3. रशिया – कोरोनाबाधित 5,61,091 (+7,790), मृत 7,660 (+182)
  4. भारत – कोरोनाबाधित 3,81,091 (+13,827) , मृत 12,604 (+342)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 3,00,469 (+1,218), मृत 42,288 (+135)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,92,348 (+585), मृत 27,136 (+0)
  7. पेरू –  कोरोनाबाधित 2,44,388 (+3,480) , मृत 7,461 (+204)
  8. इटली – कोरोनाबाधित 2,38,159 (+331), मृत 34,514 (+66)
  9. चिली – कोरोनाबाधित 225,103 (+4,475), मृत 3,841 (+226)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,97,647 (+2,596), मृत 9,272 (+87)
  11. जर्मनी – कोरोनाबाधित 1,90,126 (+622), मृत 8,946 (+19)
  12. टर्की – कोरोनाबाधित 1,84,031 (+1,304), मृत 4,882 (+21)
  13. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,60,118 (+5,358), मृत 3,093 (+118)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,59,793 (+4,930), मृत 19,080 (+770)
  15. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,58,641 (+467), मृत 29,603 (+28)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,45,991 (+4,757) मृत 1,139 (+48)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 102,292 (+3,803), मृत 1,343 (+38)
  18. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,00,220 (+367), मृत 8,300 (+46)
  19. कतार – कोरोनाबाधित 84,441 (+1,267), मृत 86 (+4)
  20. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 83,890 (+3,478), मृत 1,737 (+63)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.