Corona World Update: दिलासादायक! एकूण 60 लाख कोरोनाबाधितांपैकी आता 30 लाख सक्रिय कोरोना रुग्ण

Corona World Update: Assuring! Out of 6 million corona victims, now 3 million active corona locations, Corona Recovery 44% कोरोनामुक्तांचे प्रमाण 44 टक्क्यांवर!

एमपीसी न्यूज – जगात काल (शुक्रवारी) कोरोनाच्या सुमारे सव्वालाख नव्या रुग्णांची भर पडली. एका दिवसातील आतापर्यंतचा हा नव्या कोरोना रुग्णांचा उच्चांक आहे. काल जगात एकूण 4 हजार 872 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्येने 60 लाखांचा टप्पा ओलांडला असून त्यापैकी सध्या सुमारे 30 लाख सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण आता 49.82 टक्क्यांपर्यंत खाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 44 टक्क्यांहून अधिक झाले आहे, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 60 लाख 30 हजार 573 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 66 हजार 812 (6.08 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 26 लाख 59 हजार 270 (44.09 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 30 लाख 04 हजार 491 (49.82 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 29 लाख 50 हजार 757 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53,734 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

23 मे – नवे रुग्ण 99 हजार 938, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 183

24 मे – नवे रुग्ण 96 हजार 505, दिवसभरातील मृतांची संख्या 2 हजार 826

25 मे – नवे रुग्ण 89 हजार 756, दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 096

26 मे – नवे रुग्ण 92 हजार 060, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 048

27 मे – नवे रुग्ण 1 लाख 06 हजार 475, दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 283

28 मे – नवे रुग्ण 1 लाख 16 हजार 304, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 612

29 मे – नवे रुग्ण 1 लाख 25 हजार 511, दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 872

अमेरिकेत पाच लाखांपेक्षा अधिक कोरोनामुक्त

अमेरिकेत शुक्रवारी 1,212 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 04 हजार 542 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 17 लाख 93 हजार 530 झाली आहे तर 5 लाख 19 हजार 569 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधित मृतांचा आकडा 28 हजारांच्या घरात

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 1,180 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 27 हजार 944 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 68 हजार 338 झाली आहे तर 1 लाख 93 हजार 181 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मेक्सिकोमध्ये काल (बुधवारी) 447, इंग्लंडमध्ये 324, भारतात 269 तर रशियात 232 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. पेरूमध्ये 131, कॅनडा 102, इटली 87, स्वीडन 84, पाकिस्तान 57, चिली 54, फ्रान्स 52 तर इराणमध्ये 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 1,793,530 (+25,069), मृत 104,542 (+1,212)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 4,68,338 (+29,526), मृत 27,944 (+1,180)
  3. रशिया – कोरोनाबाधित 3,87,623 (+8,572), मृत 4,374 (+232)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 2,85,644 (+658), मृत 27,121 (+2)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,71,222 (+2,095), मृत 38,161 (+324)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,32,248 (+516), मृत 33,229 (+87)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,86,835 (+597), मृत 28,714 (+52)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,83,019 (+567), मृत 8,594 (+24)
  9. भारत – कोरोनाबाधित 1,73,491 (+8,105) , मृत 4,980 (+269)
  10. टर्की – कोरोनाबाधित 162,120 (+1,141), मृत 4,489 (+28)
  11. पेरू –  कोरोनाबाधित 1,48,285 (+6,506) , मृत 4,230 (+131)
  12. इराण – कोरोनाबाधित 146,668 (+2,819), मृत 7,677 (+50)
  13. चिली – कोरोनाबाधित 90,638 (+3,695), मृत 944 (+54)
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 89,418 (+906), मृत 6,979 (+102)
  15. चीन – कोरोनाबाधित 82,995 (NA), मृत 4,634 (+NA)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 81,766 (+1,581) मृत 458 (+17)
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 81,400 (+3,377), मृत 9,044 (+447)
  18. पाकिस्तान – कोरोनाबाधित 64,028 (+2,801), मृत 1,317 (+57)
  19. बेल्जियम – कोरोनाबाधित 58,061 (+212), मृत 9,430 (+42)
  20. कतार – कोरोनाबाधित 52,907 (+1,993), मृत 36 (+3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.