Corona World Update: कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने ओलांडला चार लाखांचा टप्पा!

Corona World Update: Corona death toll crosses 4 lakh mark!

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यापैकी 1 लाख 12 हजार 096 कोरोना बळी एकट्या अमेरिकेत गेले आहेत. कोरोनाबाधितांचे आणि मृतांचे आकडे वाढत असले तरी जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.76 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कोरोनावर मात करणाऱ्याचे प्रमाण 48.91 टक्क्यांपर्यंत वाढले आहे तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 45.33 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासा देणारी बाब आहे. दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या आणि कोरोना बळींची संख्या काल (शनिवारी) तुलनेत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 69 लाख 74 हजार 721 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 02 हजार 094 (5.76 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34 लाख 11 हजार 281 (48.91 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 31 लाख 61 हजार 346 (45.33 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 31 लाख 07 हजार 760 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 586 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

31 मे – नवे रुग्ण 1 लाख 08 हजार 767,  मृतांची संख्या 3 हजार 191

1 जून – नवे रुग्ण 1 लाख 03 हजार 050, मृतांची संख्या 3 हजार 017

2 जून – नवे रुग्ण 1 लाख 15 हजार 215, कोरोनामुक्त 1 लाख 07 हजार 201, मृतांची संख्या 4 हजार 669 

3 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 413,  कोरोनामुक्त 1 लाख 53 हजार 699, मृतांची संख्या 4 हजार 929

4 जून – नवे रुग्ण 1 लाख 29 हजार 990,  कोरोनामुक्त 80 हजार 831, मृतांची संख्या 5 हजार 499

5 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 529,  कोरोनामुक्त 89 हजार 947, मृतांची संख्या 4 हजार 906

6 जून – नवे रुग्ण 1 लाख 26 हजार 715,  कोरोनामुक्त 75 हजार 764, मृतांची संख्या 4 हजार 177

भारतात एका दिवसांत सर्वाधिक 10,438 नवे रुग्ण तर 297 जणांचा बळी

वाढत्या कोरोना संसर्गामुळे भारताने इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत काल सहावे स्थान मिळविले आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 46 हजार 622 झाली आहे. काल (शनिवारी) 10,438 नव्या रुग्णांची भर पडली. एका दिवसात नोंद झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. गेल्या काही दिवसांत दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे, ही चिंतेची बाब आहे.

भारतात मृत्यूदर 2.82 टक्के, जागतिक दरापेक्षा निम्म्याहून कमी

भारतात काल (शनिवारी) 297 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित बळींचा आकडा 6,946 पर्यंत पोहचला आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा वाढला असला तरी भारताने मृत्यूदर 2.82 टक्के इतका मर्यादित ठेवण्यात यश मिळविले आहे. जागतिक मृत्यूदर 5.76 टक्के आहे. म्हणजेच भारतातील मृत्यूदर जागतिक मृत्यूदराच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. 

भारतात सक्रिय रुग्णांचे प्रमाण 49 टक्के

आतापर्यंत 1 लाख 18 हजार 695 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण 48.13 टक्के झाले आहे. भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 20 हजार 981 झाली आहे. हे प्रमाण 49.05 टक्के झाले आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढणे आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण घटणे या दोन्ही गोष्टी भारताच्या दृष्टीने आशादायक आहेत.

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांच्या उंबरठ्यावर

अमेरिकेत काल (शनिवारी) 706 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 12 हजार 096 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 19 लाख 88 हजार 544 झाली आहे तर 7 लाख 51 हजार 695 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये एका दिवसात 910 कोरोना बळी 

ब्राझीलमध्ये शनिवारी 910 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 35 हजार 957 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6 लाख 73 हजार 587 झाली आहे तर 3 लाख 02 हजार 084 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. ब्राझिलमधील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मृतांच्या आकड्यांमुळे भीती अधिकच वाढली आहे.

मेक्सिकोत एका दिवसात 816 कोरोनाबाधितांचा मृत्यू

मेक्सिकोत शनिवारी एका दिवसात 625 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मेक्सिकोत कोरोनाबाधित मृतांची संख्या आता 13 हजार 170 झाली आहे.  मेक्सिकोत 1 लाख 10 हजार 026 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 78 हजार 590 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असले तरी गेल्या काही दिवसांत मृतांच्या आकड्यात लक्षणीय वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

इंग्लंडमध्ये शनिवारी 204 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. रशियात 197 तर पेरूमध्ये 139 कोरोना बळी गेले आहेत. पाकिस्तानमध्ये 97, चिलीत 93, इराणमध्ये 75, इटलीत 72, कॅनडामध्ये 70, कोलंबियात 60 तर ग्वाटेमालामध्ये 58 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाली आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे., 

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 19,88,544 (+22,836), मृत 1,12,096 (+706)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 6,73,587 (+27,581), मृत 35,957 (+910)
  3. रशिया – कोरोनाबाधित 4,58,689 (+8,855), मृत 5,725 (+197)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 2,88,390 (+332), मृत 27,135 (+1)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,84,868 (+1,557), मृत 40,465 (+204)
  6. भारत – कोरोनाबाधित 2,46,622 (+10,438) , मृत 6,946 (+297)
  7. इटली – कोरोनाबाधित 2,34,801 (+270), मृत 33,846 (+72)
  8. पेरू –  कोरोनाबाधित 1,91,758 (+4,358) , मृत 5,301 (+139)
  9. जर्मनी – कोरोनाबाधित 1,85,696 (+282), मृत 8,769 (+6)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,69,425 (+2,269), मृत 8,209 (+75)
  11. टर्की – कोरोनाबाधित 1,69,218 (+878), मृत 4,669 (+21)
  12. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,53,634 (+579), मृत 29,142 (+31)
  13. चिली – कोरोनाबाधित 1,27,745 (+5,246), मृत 1,541 (+93)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,10,026 (+4,346), मृत 13,170 (+625)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 98,869 (+3,121) मृत 676 (+34)
  16. कॅनडा –  कोरोनाबाधित 95,057 (+722), मृत 7,773 (+70)
  17. पाकिस्तान – कोरोनाबाधित 93,983 (+4,734), मृत 1,935 (+97)
  18. चीन – कोरोनाबाधित 83,030 (+3), मृत 4,634 (0)
  19. कतार – कोरोनाबाधित 67,195 (+1,700), मृत 51 (2)
  20. बांगलादेशकोरोनाबाधित 63,026 (+2,635), मृत 846 (35)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.