Corona World Update: कोरोनाबाधितांची संख्या 90 लाखांच्या पुढे, तथापि सक्रिय रुग्ण संख्या 37.4 लाखांपेक्षा कमी

Corona World Update: Corona outbreak exceeds 9 million, however active number less than 3.74 million जगातील 53.48 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण 5.20 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 41.32 टक्के

एमपीसी न्यूज – जगात काल (रविवारी) एका दिवसात 1 लाख 30 हजार 254 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 1 लाख 685 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. जगातील  कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 90 लाखांच्या पुढे गेला असला तरी त्यापैकी 48.34 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आणखी वाढून 53.48 टक्के झाली आहे. जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.20 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 41.32 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासादायक बाब आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 90 लाख 38 हजार 809 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 69 हजार 604 (5.20 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 48 लाख 34 हजार 139 (53.48 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 37 लाख 35 हजार 066 (41.32 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 36 लाख 81 हजार 705 (98.5 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 54 हजार 737 (1.5 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

14 जून – नवे रुग्ण 1 लाख 23 हजार 783,  कोरोनामुक्त 71 हजार 423, मृतांची संख्या 3 हजार 258

15 जून – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 600,  कोरोनामुक्त 90 हजार 756, मृतांची संख्या 3 हजार 415

16 जून – नवे रुग्ण 1 लाख 42 हजार 557,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 806 , मृतांची संख्या 6 हजार 592

17 जून – नवे रुग्ण 1 लाख 41 हजार 872 ,  कोरोनामुक्त 1 लाख 08 हजार 580, मृतांची संख्या 5 हजार 264

18 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 528 ,  कोरोनामुक्त 96 हजार 845 , मृतांची संख्या 5 हजार 123

19 जून – नवे रुग्ण 1 लाख 81 हजार 005 ,  कोरोनामुक्त 1 लाख 10 हजार 910 , मृतांची संख्या 5 हजार 066

20 जून – नवे रुग्ण 1 लाख 56 हजार 923 ,  कोरोनामुक्त 1 लाख 12 हजार 990 , मृतांची संख्या 4 हजार 428

21 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 254 ,  कोरोनामुक्त 1 लाख 685 , मृतांची संख्या 3 हजार 338

अमेरिकेत दिवसातील कोरोना बळींचा आकडा भारतापेक्षाही कमी 

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (रविवारी) 26 हजार 079 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख 56 हजार 657 झाली आहे.रविवारी 267 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 22 हजार 247 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 9 लाख 80 हजार 355 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 12 लाख 54 हजार 055 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमधील रविवारी 601 कोरोना मृत्यू

ब्राझीलमध्ये रविवारी 601 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 50 हजार 659 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 10 लाख 86 हजार 990 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 5 लाख 79 हजार 226 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 57 हजार 105 आहे.

भारतात रविवारी 426 कोरोना बळी

भारतात रविवारी एका दिवसात 426 कोरोना बळींची नोंद झाली आहे. मेक्सिकोत 307, चिली व पेरूमध्ये प्रत्येकी 184, पाकिस्तानमध्ये 119, इराणमध्ये 116, कोलंबियात 111 तर रशियात 109 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. इजिप्त व इराकमध्ये 87, इक्वाडोरमध्ये 67 तर दक्षिण अप्रिकेत 53 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत चिली आठव्या स्थानावर

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत चिलीने इटलीला मागे टाकत आठवे स्थान मिळविले आहे. चिलीत रविवारी 5 हजार 607 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 42 हजार 355 वर पोहचली आहे. त्यापैकी तब्बल 2 लाख 569 जणांनी कोरोनावर मात केली आहे. चिलीत आता 37 हजार 307 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोना बळींचा आकडा 4 हजार 479 इतका आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 23,56,657 (+26,079), मृत 1,22,247 (+267)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 1,086,990 (+16,851), मृत 50,659 (+601)
  3. रशिया – कोरोनाबाधित 5,84,680 (+7,728), मृत 8,111 (+109)
  4. भारत – कोरोनाबाधित 4,26,910 (+15,183) , मृत 13,703 (+426)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 304,331 (+1,221), मृत 42,632 (+43)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,93,352 (+334), मृत 28,323 (+1)
  7. पेरू –  कोरोनाबाधित 2,54,936 (+3,598) , मृत 8,045 (+184)
  8. चिली – कोरोनाबाधित 2,42,355 (+5,607), मृत 4,479 (+184)
  9. इटली – कोरोनाबाधित 2,38,499 (+224), मृत 34,634 (+24)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,04,952 (+2,368), मृत 9,623 (+116)
  11. जर्मनी – कोरोनाबाधित 1,91,575 (+359), मृत 8,962 (+1)
  12. टर्की – कोरोनाबाधित 1,87,685 (+1,192), मृत 4,950 (+23)
  13. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,76,617 (+4,951), मृत 3,501 (+119)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,75,202 (+4,717), मृत 20,781 (+387)
  15. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,60,377 (+284), मृत 29,640 (+7)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,57,612 (+3,379) मृत 1,267 (+37)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,12,306 (+3,531), मृत 1,464 (+39)
  18. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,01,337 (+318), मृत 8,430 (+20)
  19. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 97,302 (+4,621), मृत 1,930 (+53)
  20. कतार – कोरोनाबाधित 87,369 (+881), मृत 98 (+4)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.