World Update: जगातील कोरोना बळींची एकूण संख्या 30 हजार 855 तर इटलीतील बळी 10 हजार 23!

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूने जगात अक्षरश: थैमान घातले आहे. जगातील कोरोना बळींचा आकडा 30 हजार 855 वर जाऊन पोहचला आहे. इटलीमध्ये तर मृत्यूचे तांडव सुरू आहे. इटलीतील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या 10 हजार 23 पर्यंत वाढली आहे. जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6 लाख 63 हजार 168 झाला आहे.  कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग अमेरिकेत झाला असून 1 लाख 23 हजार 498 अमेरिकन नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे.

जगातील प्रगत राष्ट्रामधील ही आकडेवारीवर नजर टाकली असता भारताने आतापासूनच किती काळजी घेतली पाहिजे, हे आपल्या लक्षात येईल. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी ही आकडेवारी मुद्दाम देत आहोत.

जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6,63,168 असून मृतांचा आकडा 30,855 आहे. उपचारांनंतर जगभरात एकूण 1,41,953 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता जगात एकूण सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 4,90,360 आहे. त्यापैकी 25,207 जणांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित

अमेरिकेत 1,23,498 रुग्णांपैकी 2,666 जणांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. आतापर्यंत अमेरिकेत 2,211 कोरानाबाधितांचा मृत्यू झाला आहे. उपचारांनंतर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3,231 आहे.

इटलीत कोरोनाचे १० हजारांहून अधिक बळी

कोरोनामुळे सर्वात जास्त नुकसान इटली या देशाला सहन करावे लागत आहे. इटलीत आतापर्यंत तब्बल 10,023 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 92,472 असून त्यापैकी 3,856 रुग्णांची तब्येत गंभीर अथवा चिंताजनक आहे. उपचारांनी बरे झालेल्या रुग्णांची संख्या 12,384 आहे.

चीनमध्ये 75 हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त

चीनमध्ये कोरोनाचा विषाणू सर्वप्रथम आढळला व तेथून तो झपाट्याने जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला. त्या चीनने कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे. चीनमध्ये एकूण 81,439 कोरोनाबाधितांची नोंद आहे. त्यापैकी 75,448 रुग्ण आता कोरोना निगेटीव्ह झाले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 3,300 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 742 जणांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पेन, जर्मनी, फ्रान्स, इराणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठी

स्पेन, जर्मनी, फ्रान्स, इराणमध्ये कोरोनाबाधितांची संख्या खूप मोठी आहे. कोरोनाची लागण झालेल्या प्रमुख देशांतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात त्या देशातील कोरोना बळींची संख्या दिली आहे

_MPC_DIR_MPU_II

स्पेन 73,235 (5982)

जर्मन 57,695 (433)

फ्रान्स 37,575 (2314)

इराण 35,408 (2517)

युनायटेड किंगडम – यूके 17,089 (1019)

स्वित्झर्लंड 14,076 (264)

नेदरलँड 9,762 (639)

दक्षिण कोरिया 9,478 (144)

बेल्जियम 9,134 (353)

ऑस्ट्रेलिया 8,271 (68)

टर्की 7,402 (108)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.