Corona World Update: टक्केवारी घसरली तरी सक्रिय रुग्णांची संख्या 50 लाखांच्या उंबरठ्यावर

Corona World Update: Despite declining percentage, the number of active patients is on the threshold of 50 lakh कोरोना बळींचा आकडा पावणेसहा लाखांच्या पुढे, कोरोना मृत्यूदर 4.35 टक्के

एमपीसी न्यूज – जगभरात काल (सोमवारी) 1 लाख 95 हजार 878 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यामुळे जगातील एकूण कोरोना संसर्ग 1.32 कोटींच्या पुढे वाढला आहे. त्यातील सुमारे 77 लाख रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. जगातील सक्रिय रुग्णांची टक्केवारी 37.50 टक्क्यांपर्यंत खाली आली असली तरी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 58.15 टक्के झाले आहे. काल (सोमवारी) एका दिवसात 1 लाख 13 हजार 919 रुग्ण बरे झाले. कोरोनाबाधित मृतांचे प्रमाण आता 4.35 टक्क्यांपर्यंत कमी आले आहे, ही थोडा दिलासा देणारी बाब मानण्यात येत आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 32 लाख 35 हजार 751 झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 75 हजार 525 (4.35 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 76 लाख 96 हजार 381 (58.15 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 49 लाख 63 हजार 845 (37.50 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 49 लाख 04 हजार 964 (98.81 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 58 हजार 881 (1.19 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

7 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 087, कोरोनामुक्त 2 लाख 08 हजार 243, मृतांची संख्या 5 हजार 515

8 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 13 हजार 280, कोरोनामुक्त 1 लाख 80 हजार 299, मृतांची संख्या 5 हजार 518

9 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 22 हजार 825, कोरोनामुक्त 1 लाख 56 हजार 623, मृतांची संख्या 5 हजार 404

10 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 36 हजार 918,  कोरोनामुक्त 1 लाख 47 हजार 743, मृतांची संख्या 5 हजार 416

11 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 14 हजार 786,  कोरोनामुक्त 1 लाख 45 हजार 522, मृतांची संख्या 5 हजार 015

12 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 94 हजार 677,  कोरोनामुक्त 1 लाख 02 हजार 610, मृतांची संख्या 3 हजार 956

13 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 95 हजार 878,  कोरोनामुक्त 1 लाख 13 हजार 919, मृतांची संख्या 3 हजार 731

अमेरिकेत सोमवारी 65 हजार 488 नव्या रुग्णांची भर

अमेरिकेत सोमवारी 65 हजार 488 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 34 लाख 79 हजार 483 झाली आहे. सोमवारी अमेरिकेत 465 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 38 हजार 247 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 15 लाख 49 हजार 469 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 17 लाख 91 हजार 767 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये सोमवारी 770 कोरोना बळी

ब्राझीलमध्ये सोमवारी 770 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 72 हजार 921 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 87 हजार 959 झाली असून त्यापैकी 12 लाख 13 हजार 512 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 6 लाख 01 हजार 526 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 35 हजारांवर

मेक्सिकोत सोमवारी 276 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 35 हजार 006 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 2 लाख 99 हजार 750 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 1 लाख 84 हजार 764 रुग्ण बरे झाले असून 79 हजार 980 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात सोमवारी 540 कोरोना बळी

भारतात सोमवारी 540 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. इराणमध्ये 200, पेरूमध्ये 184, कोलंबियात 148, रशियात 104 तर इराकमध्ये 100 कोरोना बळी गेले. दक्षिण अफ्रिकेत 93, इजिप्तमध्ये 77, पाकिस्तानात 69, फिलिपाइन्समध्ये 65, अर्जेंटिनामध्ये 58, बोलिवियात 53 तर इंडोनेशियात 50 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 34,79,483 (+65,488), मृत 1,38,247 (+465)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 18,87,959 (+21,783), मृत 72,921 (+770)
  3. भारत – कोरोनाबाधित 9,07,645 (+28,179) , मृत 23,727 (+540)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,33,699 (+6,537), मृत 11,439 (+104)
  5. पेरू – कोरोनाबाधित 3,30,123 (+3,797), मृत 12,054 (+184)
  6. चिली – कोरोनाबाधित 3,17,657 (+2,616), मृत 7,024 (+45)
  7. स्पेन –  कोरोनाबाधित 303,033 (+681), मृत 28,406 (+1)
  8. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,99,750 (+4,482), मृत 35,006 (+276)
  9. यू. के. – कोरोनाबाधित 2,90,133 (+530), मृत 44,830 (+11)
  10. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 2,87,796 (+11,554), मृत 4,172 (+93)
  11. इराणकोरोनाबाधित 2,59,652 (+2,349), मृत 13,032 (+203)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,51,625 (+2,753), मृत 5,266 (+69)
  13. इटली – कोरोनाबाधित 2,43,230 (+169), मृत 34,967 (+13)
  14. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,35,111 (+2,852), मृत 2,243 (+20)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,14,001 (+1,008) मृत 5,382 (+19)
  16. जर्मनी – कोरोनाबाधित 2,00,436 (+486), मृत 9,139 (+5)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,86,894 (+3,099), मृत 2,391 (+39)
  18. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,72,377 (+288), मृत 30,029 (+18)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,54,277 (+3,832), मृत 5,455 (+148)
  20. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,08,155 (+565), मृत 8,790 (+7)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.