Corona World Update: सलग दुसऱ्या दिवशी कोरोना मृत्यूंची संख्या साडेतीन हजारांपेक्षा कमी

कोरोनामुक्तांचे प्रमाणात 54.42 टक्क्यांपर्यंत वाढ तर कोरोना मृतांचे प्रमाण 4.88 टक्क्यांपर्यत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 40.69 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी जवळजवळ 56 लाख 64 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हे प्रमाण आता 54.42 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. जगातील मृत्यूदरही हळूहळू कमी होत असून आता तो 4.69 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोना मृत्यूंची संख्या साडेतीन हजारांपेक्षा कमी आहे, या आशादायक बाबींबरोबरच अजूनही सुमारे 42 लाख 35 हजार सक्रिय रुग्ण जगभरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.  

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 4 लाख 08 हजार 433 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 8 हजार 078 (4.88 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 56 लाख 64 हजार 407 (54.42 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 42 लाख 35 हजार 948 (40.69 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 41 लाख 78 हजार 418 (98.64 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 57 हजार 530 (1.36 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

23 जून – नवे रुग्ण 1 लाख 62 हजार 994, कोरोनामुक्त 1 लाख 19 हजार 809 , मृतांची संख्या 5 हजार 465

24 जून – नवे रुग्ण 1 लाख 72 हजार 383, कोरोनामुक्त 1 लाख 32 हजार 611, मृतांची संख्या 5 हजार 071

25 जून – नवे रुग्ण 1 लाख 79 हजार 718, कोरोनामुक्त 85 हजार 189, मृतांची संख्या 5 हजार 179

26 जून – नवे रुग्ण 1 लाख 93 हजार 974, कोरोनामुक्त 98 हजार 484, मृतांची संख्या 4 हजार 891

27 जून – नवे रुग्ण 1 लाख 76 हजार 568, कोरोनामुक्त 1 लाख 01 हजार 108, मृतांची संख्या 4 हजार 547

28 जून – नवे रुग्ण 1 लाख 63 हजार 172, कोरोनामुक्त 95 हजार 410, मृतांची संख्या 3 हजार 454

29 जून – नवे रुग्ण 1 लाख 60 हजार 985, कोरोनामुक्त 1 लाख 09 हजार 374, मृतांची संख्या 3 हजार 415

अमेरिकेत सक्रिय कोरोना रुग्ण संख्या 14 लाखांच्या पुढे

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (सोमवारी) 44 हजार 734 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 26 लाख 81 हजार 811 झाली आहे. सोमवारी 346 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 28 हजार 783 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 11 लाख 17 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 14 लाख 35 हजार 851 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये सोमवारी 727 कोरोनाबाधितांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये सोमवारी 727 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 58 हजार 385 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 13 लाख 70 हजार 488 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 7 लाख 57 हजार 462 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 53 हजार 748 आहे.

मेक्सिको सोमवारी 267 कोरोना बळी

सोमवारी मेक्सिकोत जगातील सर्वाधिक म्हणजे 267 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेले काही दिवस मेक्सिकोत एका दिवसात अमेरिका व ब्राझीलपेक्षाही जास्त कोरोना बळी जात होते, मात्र सोमवारी मृतांच्या प्रमाणात मोठी घट दिसून आल्याने मेक्सिकोला काहीसा दिलासा मिळाला आहे. मेक्सिकोतील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 16 हजार 852 झाली असून आतापर्यंत 26 हजार 648 कोरोना बळी गेले आहे.

भारतात सोमवारी 417 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भारतात सोमवारी 417 कोरोना बळींची नोंद झाली आहे. पेरूमध्ये 187, इराणमध्ये 162, कोलंबियात 117, रशियामध्ये 93, इजिप्त व इराकमध्ये प्रत्येकी 83, इक्वाडोर व दक्षिण अफ्रिकेत प्रत्येकी 73, चिलीत 66 तर इंडोनेशियात 51 बळी गेले आहेत.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

 1. अमेरिका – कोरोनाबाधित 26,81,811 (+44,734), मृत 1,28,783 (+346)
 2. ब्राझील – कोरोनाबाधित 13,70,488 (+25,234), मृत 58,385 (+727)
 3. रशिया – कोरोनाबाधित 6,41,156 (+6,719), मृत 9,166 (+93)
 4. भारत – कोरोनाबाधित 5,67,536 (+18,339) , मृत 16,904 (+417)
 5. यू. के. – कोरोनाबाधित 3,11,965 (+814), मृत 43,575 (+25)
 6. स्पेन – कोरोनाबाधित 2,96,050 (+200), मृत 28,346 (+3)
 7. पेरू –  कोरोनाबाधित 2,82,365 (+2,946), मृत 9,504 (+187)
 8. चिली – कोरोनाबाधित 275,999 (+4,017), मृत 5,575 (+66)
 9. इटली – कोरोनाबाधित 2,40,436 (+126), मृत 34,744 (+6)
 10. इराण – कोरोनाबाधित 2,25,205 (+2,536), मृत 10,670 (+162)
 11. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,16,852 (+4,050), मृत 26,648 (+267)
 12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 206,512 (+3,557), मृत 4,167 (+49)
 13. टर्की – कोरोनाबाधित 1,98,613 (+1,374), मृत 5,115 (+18)
 14. जर्मनी – कोरोनाबाधित 195,392 (+528), मृत 9,041 (+12)
 15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,86,436 (+3,943) मृत 1,599 (+48)
 16. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,64,260 (+280), मृत 29,813 (+18)
 17. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 1,44,264 (+6,130), मृत 2,529 (+73)
 18. बांगलादेशकोरोनाबाधित 1,41,801 (+4,014), मृत 1,783 (+45)
 19. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,03,918 (+668), मृत 8,566 (+44)
 20. कतार – कोरोनाबाधित 95,106 (+693), मृत 113 (+3)
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like