Corona World Update: गुरुवारी दोन्ही उच्चांक! नव्या रुग्णांबरोबरच कोरोनामुक्तीचाही!

Corona World Update: Highest figures of both, new patients as well as new corona cured patients! कोरोनामुक्तांचे प्रमाण 55.91 टक्के, कोरोना मृत्यूदर 4.77 टक्क्यांपर्यंत खाली, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 39.32 टक्के

एमपीसी न्यूज – जगातील नवे कोरोनाबाधित रुग्ण आणि नवे कोरोनामुक्त या दोन्ही संख्यांनी काल (गुरुवारी) दोन लाखांचा टप्पा ओलांडत नवा उच्चांक गाठला. गुरुवारी दोन लाख आठ हजार 864 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी दोन लाख 278 रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्तांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाबाधित मृतांचे व सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे जगभरातील कोरोनाबाबत चिंतेचे वातावरण निवळण्यास मदत होणार आहे.  

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 09 लाख 82 हजार 236 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 23 हजार 947 (4.77 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 61 लाख 39 हजार 611 (55.91 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 43 लाख 18 हजार 678 (39.32 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 42 लाख 60 हजार 544 (98.65 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 58 हजार 134 (1.35 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

25 जून – नवे रुग्ण 1 लाख 79 हजार 718, कोरोनामुक्त 85 हजार 189, मृतांची संख्या 5 हजार 179

26 जून – नवे रुग्ण 1 लाख 93 हजार 974, कोरोनामुक्त 98 हजार 484, मृतांची संख्या 4 हजार 891

27 जून – नवे रुग्ण 1 लाख 76 हजार 568, कोरोनामुक्त 1 लाख 01 हजार 108, मृतांची संख्या 4 हजार 547

28 जून – नवे रुग्ण 1 लाख 63 हजार 172, कोरोनामुक्त 95 हजार 410, मृतांची संख्या 3 हजार 454

29 जून – नवे रुग्ण 1 लाख 60 हजार 985, कोरोनामुक्त 1 लाख 09 हजार 374, मृतांची संख्या 3 हजार 415

30 जून – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 814, कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 375, मृतांची संख्या 5 हजार 062

1 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 96 हजार 901, कोरोनामुक्त 1 लाख 32 हजार 758, मृतांची संख्या 4 हजार 847

2 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 864, कोरोनामुक्त 2 लाख 278 , मृतांची संख्या 5 हजार 155

अमेरिकेत एका दिवसात 57 हजार नवे रुग्ण

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (गुरुवारी) 57 हजार 236 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 28 लाख 37 हजार 189 झाली आहे. गुरुवारी 687 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 31 हजार 485 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 11 लाख 91 हजार 091 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 15 लाख 14 हजार 613 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये एका दिवसात 89,281 कोरोनामुक्तांची नोंद!

ब्राझीलमध्ये गुरूवारी 1,277 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 61 हजार 990 वर जाऊन पोहचला आहे. त्याचवेळी गुरुवारी तब्बल 89 हजार 281 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ब्राझीलमध्ये एकूण 15 लाख 01 हजार 353 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 9 लाख 16 हजार 147 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 23 हजार 216 झाली आहे.

मेक्सिको गुरुवारी 741 कोरोना बळी 

गुरुवारी मेक्सिकोत 741 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. मेक्सिकोतील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 31 हजार 770 झाली असून त्यापैकी 1 लाख 38 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 28 हजार 510 कोरोना बळी गेले आहे. त्यामुळे आता मेक्सिकोत 64 हजार 941 टक्के सक्रिय रुग्ण उरले आहेत.

भारतात गुरुवारी 377 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भारतात गुरुवारी 377 कोरोना बळींची नोंद झाली आहे. पेरूमध्ये 185, कोलंबियात 171, चिलीत 167, इराणमध्ये 148, रशियात 147 तर इराकमध्ये  110 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. दक्षिण अफ्रिकेत 95, इंग्लंडमध्ये 89, इजिप्तमध्ये 86, पाकिस्तान व बोलिवियात प्रत्येकी 78, इक्वाडोरमध्ये 63, सौदी अरेबियात 54 तर इंडोनेशियात 53 बळी गेले आहेत.

इंग्लंड पाचवरून आठव्या स्थानावर, जर्मनी 15 व्या तर फ्रान्स 17 व्या स्थानावर

सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या जागतिक क्रमवारीत इंग्लंड पाचव्या स्थानावरून आठव्या स्थानावर गेला आहे. स्पेन, पेरू व चिली अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर पोहचले आहेत. जर्मनी 14 व्या स्थानावरून 15 स्थानावर तर फ्रान्स 16 व्या स्थानावरून 17 व्या स्थानावर गेला आहे. सौदी अरेबिया व दक्षिण अफ्रिका अनुक्रमे 14 व्या व 16 स्थानावर आहेत. कॅनडाला मागे टाकत कोलंबिया 19 व्या स्थानावर पोहचला आहे. कॅनडा सध्या 20 व्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 28,37,189 (+57,236), मृत 1,31,485 (+687)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 15,01,353 (+47,984), मृत 61,990 (+1,277)
  3. रशिया – कोरोनाबाधित 6,61,165 (+6,760), मृत 9,683(+147)
  4. भारत – कोरोनाबाधित 6,27,168 (+21,948) , मृत 18,225 (+377)
  5. स्पेन – कोरोनाबाधित 2,97,183 (+444), मृत 28,368 (+5)
  6. पेरू –  कोरोनाबाधित 2,88,477 (+3,527), मृत 10,045 (+185)
  7. चिली – कोरोनाबाधित 2,84,541 (+2,498), मृत 5,920 (+167)
  8. यू. के. – कोरोनाबाधित 2,83,757 (+576), मृत 43,995 (+89)
  9. इटली – कोरोनाबाधित 2,40,961 (+201), मृत 34,818 (+30)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,32,863 (+2,652), मृत 11,106 (+148)
  11. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,31,770 (+5,681), मृत 28,510 (+741)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,17,809 (+4,339), मृत 4,473 (+78)
  13. टर्की – कोरोनाबाधित 202,284 (+1,186), मृत 5,167 (+17)
  14. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,97,608 (+3,383) मृत 1,752 (+54)
  15. जर्मनी – कोरोनाबाधित 1,96,717 (+393), मृत 9,064 (+3)
  16. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 1,68,061 (+8,728), मृत 2,844 (+95)
  17. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,66,378 (+659), मृत 29,875 (+14)
  18. बांगलादेशकोरोनाबाधित 1,53,277 (+4,019), मृत 1,926 (+38)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,06,110 (+4,101), मृत 3,641 (+171)
  20. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,04,772 (+501), मृत 8,642 (+27)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.