Corona World Update: एका दिवसातील नव्या रुग्णांचा उच्चांक! 24 तासांत 3 लाख 58 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण!

जगातील 75.16 टक्के रुग्ण बरे, मृत्यूदर 2.89 टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 21,95 टक्के

एमपीसी न्यूज –  जगभरात काल (शुक्रवारी) 3 लाख 58 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. एका दिवसांत नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन कोटी 71 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत दोन कोटी 79 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 71 लाख 39 हजार 607 झाली असून आतापर्यंत एकूण 10 लाख 73 हजार 149 (2.89 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 79 लाख 12 हजार 550 (75.16 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 81 लाख 53 हजार 908 (21.95 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 80 लाख 85 हजार 468  (99.16 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 68 हजार 440 (0.84 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

https://www.worldometers.info/coronavirus/

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

3 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 94 हजार 378, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 30 हजार 289, मृत्यू 4 हजार 791

4 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 49 हजार 546, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 32 हजार 558, मृत्यू 4 हजार 013

5 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 64 हजार 208, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 50 हजार 257, मृत्यू 4 हजार 250

6 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 11 हजार 613, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 74 हजार 961, मृत्यू 5 हजार 553

7 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 43 हजार 517, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 62 हजार 853, मृत्यू 5 हजार 909

8 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 48 हजार 630, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 37 हजार 151, मृत्यू 6 हजार 424

9 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 58 हजार 354, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 50 हजार 462,  मृत्यू 5 हजार 807

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.