Corona World Update: आशादायक! जगातील 53.13 टक्के रुग्णांनी जिंकली कोरोनाची लढाई!

Corona World Update: Hopeful! 53.13% of patients worldwide win Corona Battle! एकूण 89 लाख कोरोनाबाधितांपैकी 47 लाख कोरोनामुक्त, 4.66 लाख रुग्णांचा मृत्यू तर 37 लाख सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – जगात काल (शनिवारी) एका दिवसात 1 लाख 56 हजार 923 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 1 लाख 12 हजार 990 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. जगातील  कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 89 लाखांच्या पुढे गेला असला तरी त्यापैकी 47.33 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी आणखी वाढून 53.13 टक्के झाली आहे. जगातील मृतांची एकूण टक्केवारी 5.23 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 41.63 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे, ही दिलासादायक बाब आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 89 लाख 08 हजार 556 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 66 हजार 266 (5.23 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 47 लाख 33 हजार 454 (53.13 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 37 लाख 08 हजार 836 (41.63 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 36 लाख 55 हजार 026 (98.5 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 54 हजार 503 (1.5 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

14 जून – नवे रुग्ण 1 लाख 23 हजार 783,  कोरोनामुक्त 71 हजार 423, मृतांची संख्या 3 हजार 258

15 जून – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 600,  कोरोनामुक्त 90 हजार 756, मृतांची संख्या 3 हजार 415

16 जून – नवे रुग्ण 1 लाख 42 हजार 557,  कोरोनामुक्त 1 लाख 05 हजार 806 , मृतांची संख्या 6 हजार 592

17 जून – नवे रुग्ण 1 लाख 41 हजार 872 ,  कोरोनामुक्त 1 लाख 08 हजार 580, मृतांची संख्या 5 हजार 264

18 जून – नवे रुग्ण 1 लाख 40 हजार 528 ,  कोरोनामुक्त 96 हजार 845 , मृतांची संख्या 5 हजार 123

19 जून – नवे रुग्ण 1 लाख 81 हजार 005 ,  कोरोनामुक्त 1 लाख 10 हजार 910 , मृतांची संख्या 5 हजार 066

20 जून – नवे रुग्ण 1 लाख 56 हजार 923 ,  कोरोनामुक्त 1 लाख 12 हजार 990 , मृतांची संख्या 4 हजार 428

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 23 लाखांच्या पुढे

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (शनिवारी) 33 हजार 388 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 23 लाख 30 हजार 578 झाली आहे. शनिवारी 573 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 21 हजार 980 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 9 लाख 72 हजार 941 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 12 लाख 35 हजार 657 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमधील कोरोना मृतांचा आकडा 50 हजारांच्या पुढे

ब्राझीलमध्ये शनिवारी 968 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 50 हजार 058 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 10 लाख 70 हजार 139 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 5 लाख 43 हजार 186 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 4 लाख 76 हजार 895 आहे.

मेक्सिकोत शुक्रवारी 667 कोरोना बळी

मेक्सिकोत शनिवारी एका दिवसात 647 कोरोना बळींची नोंद झाली आहे. भारतात 307, चिलीमध्ये 202, पेरूमध्ये 201, रशियात 161 तर पाकिस्तानमध्ये 153 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये 128, इजिप्त 89, इराक 88, कोलंबिया 81, कॅनडा 64त इंडोनेशियात 56 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत पाकिस्तान 13 व्या स्थानावर

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत पाकिस्तानने मेक्सिकोला मागे टाकत 13 वे स्थान मिळविले आहे. पाकिस्तानात शनिवारी 6 हजार 604 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 71 हजार 666 वर पोहचली आहे. त्यापैकी 63 हजार 504 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पाकिस्तान आता 1 लाख 04 हजार 780 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. कोरोना बळींचा आकडा 3 हजार 382 इतका आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 23,30,578 (+33,388), मृत 1,21,980 (+573)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 1,070,139 (+31,571), मृत 50,058 (+968)
  3. रशिया – कोरोनाबाधित 576,952 (+7,889), मृत 8,002 (+161)
  4. भारत – कोरोनाबाधित 4,11,727 (+15,915) , मृत 13,277 (+307)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 3,03,110 (+1,295), मृत 42,589 (+128)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,93,018 (+363), मृत 28,322 (+7)
  7. पेरू –  कोरोनाबाधित 2,51,338 (+3,413) , मृत 7,861 (+201)
  8. इटली – कोरोनाबाधित 2,38,275 (+264), मृत 34,610 (+49)
  9. चिली – कोरोनाबाधित 2,36,748 (+5,355), मृत 4,295 (+202)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,02,584 (+2,322), मृत 9,507 (+115)
  11. जर्मनी – कोरोनाबाधित 1,91,216 (+556), मृत 8,961 (+1)
  12. टर्की – कोरोनाबाधित 1,86,493 (+1,248), मृत 4,927 (+22)
  13. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,71,666 (+6,604), मृत 3,382 (+153)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 1,70,485 (+5,030), मृत 20,394 (+647)
  15. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,60,093 (+641), मृत 29,633 (+16)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,54,233 (+3,941) मृत 1,230 (+46)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,08,775 (+3,240), मृत 1,425 (+37)
  18. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,01,019 (+390), मृत 8,410 (+64)
  19. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 92,681 (+4,966), मृत 1,877 (+46)
  20. कतार – कोरोनाबाधित 86,488 (+1,026), मृत 94 (+1)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.