Corona World Update: भयानक 210 दिवस! कोविड-19 संक्रमण ‘अब तक’ 1,00,00,000! कोरोना बळी ‘अब तक’ 5,00,000!

Corona World Update: Horrible! Covid-19 infected 'so far' 1,00,00,000! Corona victim ‘so far’ 5,00,000! जगात 54.14 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, 4.97 टक्के रुग्णांचा मृत्यू तर 40.89 टक्के रुग्ण सक्रिय

एमपीसी न्यूज – एखादी गोष्ट जगात किती वेगाने पसरावी? जगात गेले सहा महिने हाहाकार माजवून देणारा कोविड 19 हा विषाणू 210 दिवसांत एक कोटींहून अधिक लोकांपर्यंत संक्रमित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला चीनमध्ये पहिला कोविड 19 बाधित रुग्ण आढळला आणि जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे अवघ्या 210 दिवसांत या विषाणूने एक कोटींहून अधिक लोकांच्या शरीरात प्रवेश केला. अत्यंत झपाट्याने जगात पसरलेल्या या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येने काल (27 जून) एक कोटींचा टप्पा ओलांडला. त्याच बरोबर कोरोना बळींच्या आकड्याने पाच लाखांचा टप्पा पार केला आहे. 

‘लॅन्सेट मेडिकल जर्नल’नुसार COVID-19 चा पहिला रुग्ण 1 डिसेंबरला चीनच्या वुहान येथे समोर आला होता. अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जनरल’ने दिलेल्या वृत्तानुसार कोरोना विषाणूची लक्षणं दिसलेली सर्वात पहिली (पेशंट झिरो) रुग्ण 57 वर्षीय वेई गायक्सिअन आहे. ही महिला माशांच्या बाजारात मासे विकण्याचं काम करते. 10 डिसेंबर 2019 रोजी या महिलेला एका सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यानंतर सर्दी-ताप आला होता. दरम्यान, 31 डिसेंबरला वुहानच्या आरोग्य आयुक्तांनी सर्वात आधी या महिलेचं नाव कोरोनाबाधित म्हणून जाहीर केलं होतं. सर्वात आधी कोरोनाचा संसर्ग झालेल्या पहिल्या 27 रुग्णांमध्ये या महिलेचा समावेश होता. या 27 रुग्णांपैकी 24 जणांना संबंधित महिला ज्या बाजारात मासे विकत होती तेथेच संसर्ग झाला होता.

प्रारंभी चीनपुरता मर्यादित असणारा हा साथीचा रोग फेब्रुवारीपासून जगभर झपाट्याने पसरला आहे. आता जगातील 215 देश व प्रदेशांपर्यंत कोरोना विषाणूचे संक्रमण झाले आहे. मार्चमध्ये तो जास्त वेगाने फैलावला आणि मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत जगात या आजाराने अक्षरशः मृत्यू तांडव केले. अजूनही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी जूनमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी थोडे कमी झाल्याचे तसेच कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. अजूनही कोविड 19 वर खात्रीशीर औषध आणि प्रतिबंधक लस उपलब्ध झालेली नाही, ही चिंतेची बाब आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 81 हजार 477 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 5,01,298 (4.97 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 54 लाख 58 हजार 367 (54.14 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 41 लाख 21 हजार 878 (40.89 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 40 लाख 64 हजार 130  (98.60 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 57 हजार 748 (1.40 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. 

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

21 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 254, कोरोनामुक्त 1 लाख 685 , मृतांची संख्या 3 हजार 338

22 जून – नवे रुग्ण 1 लाख 38 हजार 975, कोरोनामुक्त 82 हजार 775 , मृतांची संख्या 3 हजार 880

23 जून – नवे रुग्ण 1 लाख 62 हजार 994, कोरोनामुक्त 1 लाख 19 हजार 809 , मृतांची संख्या 5 हजार 465

24 जून – नवे रुग्ण 1 लाख 72 हजार 383, कोरोनामुक्त 1 लाख 32 हजार 611, मृतांची संख्या 5 हजार 071

25 जून – नवे रुग्ण 1 लाख 79 हजार 718, कोरोनामुक्त 85 हजार 189, मृतांची संख्या 5 हजार 179

26 जून – नवे रुग्ण 1 लाख 93 हजार 974, कोरोनामुक्त 98 हजार 484, मृतांची संख्या 4 हजार 891

27 जून – नवे रुग्ण 1 लाख 76 हजार 568, कोरोनामुक्त 1 लाख 01 हजार 108, मृतांची संख्या 4 हजार 547

अमेरिकेत सक्रिय कोरोना रुग्ण संख्या 13.5 लाखांच्या पुढे

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (शनिवारी) 43 हजार 581 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 25 लाख 96 हजार 537 झाली आहे. शनिवारी 512 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 28 हजार 152 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 लाख 81 हजार 437 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 13 लाख 86 हजार 948 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये शनिवारी 994 कोरोनाबाधितांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये शनिवारी 994 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 57 हजार 103 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 13 लाख 15 हजार 941 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 7 लाख 15 हजार 905 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख42 हजार 933 आहे.

मेक्सिको दोन लाख कोरोनाबाधित तर 25 हजार बळी

अमेरिका व ब्राझीलच्या पाठोपाठ मेक्सिकोतील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. शनिवारी मेक्सिकोत 719 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेले काही दिवस मेक्सिकोत एका दिवसात अमेरिकेपेक्षाही जास्त कोरोना बळी जात आहेत. मेक्सिकोतील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 08 हजार 392 झाली असून आतापर्यंत 25 हजार 779 कोरोना बळी गेले आहे.

भारतात शनिवारी 414 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भारतात शनिवारी 414 कोरोना बळींची नोंद झाली आहे. चिलीमध्ये 279, पेरूमध्ये 196, रशियात 188, कोलंबियात 128, इराणमध्ये 125, इराकमध्ये 101 तर इंग्लंडमध्ये 100 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. इजिप्तमध्ये 88 तर पाकिस्तान व द. अफ्रिकेत प्रत्येकी 73 बळी गेले आहेत.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

 1. अमेरिका – कोरोनाबाधित 25,96,537 (+43,581), मृत 1,28,152 (+512)
 2. ब्राझील – कोरोनाबाधित 13,15,941 (+35,887), मृत 57,103 (+994)
 3. रशिया – कोरोनाबाधित 6,27,646 (+6,852), मृत 8,969 (+188)
 4. भारत – कोरोनाबाधित 5,29,577 (+20,131) , मृत 16,103 (+414)
 5. यू. के. – कोरोनाबाधित 3,10,250 (+890), मृत 43,514 (+100)
 6. स्पेन – कोरोनाबाधित 2,95,549 (+564), मृत 28,341 (+3)
 7. पेरू –  कोरोनाबाधित 2,75,989 (+3,625) , मृत 9,135 (+196)
 8. चिली – कोरोनाबाधित 2,67,766 (+4,406), मृत 5,347 (+279)
 9. इटली – कोरोनाबाधित 2,40,136 (+175), मृत 34,716 (+8)
 10. इराण – कोरोनाबाधित 2,20,180 (+2,456), मृत 10,364 (+125)
 11. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,08,392 (+3,138), मृत 25,779 (+719)
 12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,98,883 (+2,775), मृत 4,035 (+73)
 13. टर्की – कोरोनाबाधित 1,95,883 (+1,372), मृत 5,082 (+17)
 14. जर्मनी – कोरोनाबाधित 1,94,689 (+290), मृत 9,026 (+0)
 15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,78,504 (+3,927) मृत 1,511 (+37)
 16. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,62,936 (+0), मृत 29,778 (+0)
 17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,33,978 (+3,504), मृत 1,695 (+34)
 18. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 1,31,800 (+7,210), मृत 2,413 (+73)
 19. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,03,032 (+238), मृत 8,516 (+8)
 20. कतार – कोरोनाबाधित 93,663 (+879), मृत 110 (+1)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.