Corona World Update: सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत ‘Top-10’ मध्ये

Corona World Update: India in 'Top-10' list of most corona affected countries

एमपीसी न्यूज – अडीच महिन्यांपूर्वी जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत 41 व्या स्थानावर असलेल्या भारताने काल ‘Top-10’ मध्ये प्रवेश केला आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 लाख 38 हजार 536 लोकांना कोरोना संसर्ग झाला. मे महिन्यात देशातील कोरोना रुग्णांची संख्या तिपटीने वाढून एकदम एक लाख 3 हजार 673 नव्या रुग्णांची भर पडली. देशातील कोरोनाबाधित मृतांच्या संख्येनेही चार हजारांचा आकडा ओलांडला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोनाबाधितांची संख्या हा भारतापुढे चिंतेचा विषय असला तरी कोरोनामुक्तांची वाढती संख्या आणि मर्यादित मृत्यूदर ही बाब भारताच्या दृष्टीने दिलासादायक म्हणावी लागेल.

जागतिक क्रमवारीत गेले काही दिवस 11 व्या स्थानावर असलेल्या भारताने इराणला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत 10 वे स्थान मिळविले आहे.

जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशातील एकूण रुग्णसंख्या (कंसात मृतांचे आकडे)

  1.  अमेरिका – 16 लाख 86 हजार 436 (99,300)
  2. ब्राझील  – 3 लाख 63 हजार 618 (22,716)
  3. रशिया – 3 लाख 44 हजार 481 (3,541)
  4. स्पेन – 2 लाख 82 हजार 852 (28,752)
  5. इंग्लंड – 2 लाख 59 हजार 559 (36,793)
  6. इटली – 2 लाख 29 हजार 858 (32,785)
  7. फ्रान्स – 1 लाख 82 हजार 584 (28,367)
  8. जर्मनी – 1 लाख 80 हजार 328 (8,371)
  9. टर्की – 1 लाख 56 हजार 827 (4,340)
  10. भारत – 1 लाख 38 हजार 536 (4,024)

भारतात आतापर्यंत एकूण 1 लाख 38 हजार 536 जणांचा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 57 हजार 692 रुग्णांनी (41.64 टक्के) कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत एकूण 4,034 (2.91 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतात कोरोनाचे 76 हजार 820 (55.45 टक्के) सक्रिय रुग्ण शिल्लक आहेत.

भारतात काल (रविवार) 7,113 नवे कोरोना रुग्ण सापडले तर 156 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. एका दिवसात 7,113 रुग्ण हा आतापर्यंतचा भारतात उच्चांक आहे. गेले काही दिवस दररोज सहा हजार पेक्षा अधिक नव्या रुग्णांची भर पडत होती. तो आकडा आता सात हजारांच्या पुढे गेला आहे.

गेल्या तीन महिन्यांतील कोरोनाचा प्रसार (कंसात मृतांचा आकडा)

_MPC_DIR_MPU_II

29 फेब्रुवारी – 3 (0)

31 मार्च – 1 हजार 397 (35)

30 एप्रिल – 34 हजार 863 (1 हजार 154)

24 मे – 1 लाख 38 हजार 536 (4 हजार 024)

भारतात आतापर्यंत 29 लाख 43 हजार 421 जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 1 लाख 38 हजार 536 चाचण्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. पॉझिटीव्ह रुग्णांचे प्रमाण 4.70 टक्के इतके आहे. उर्वरित 95.29 टक्के चाचण्यांचे अहवाल हे निगेटीव्ह आलेले आहेत. म्हणजेच चाचण्या झालेल्यांपैकी 28 लाख 4 हजार 885 जण कोरोना निगेटीव्ह निघाले आहेत. भारतात सरसकट कोरोना चाचण्या केल्या जात नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे. कोरोनाची लक्षणे असलेले संशयित अथवा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्यात चाचण्या केल्या जात आहेत. त्यातही केवळ 4.70 टक्केच पॉझिटीव्ह रिपोर्ट येत आहेत. ही फारशी चिंताजनक बाब नाही. चाचण्या वाढल्यामुळे रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. शासनाने घालून दिलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

भारतात कोरोनाचा कम्युनिटी ट्रान्समिशन (सामाजिक संसर्ग) नाही – जागतिक आरोग्य संघटना

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या या महिन्यात तिपटीने वाढली असली तरी भारतात कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाले नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे. क्लस्टर्स ऑफ केसेस या श्रेणीत जागतिक आरोग्य संघटनेने भारताची वर्गवारी केली आहे. त्यामुळे भारतीय घाबरून जाण्याची गरज नाही, मात्र कोरोनाचा संसर्ग आणि प्रसार होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची आवश्यता आहे.

भारतातील कोरोना रुग्ण संख्येचा चढता आलेख

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.