Corona World Update: जगातील 99.25 टक्के सक्रिय रुग्णांना झालेला कोरोना संसर्ग सौम्य स्वरूपाचा

जगातील फक्त पाऊण टक्के सक्रिय रुग्णांची प्रकृती चिंताजनक, 73.34 टक्के रुग्ण कोरोनामुक्त, मृत्यूदर 2.65 टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 24 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज –  जगभरात काल (मंगळवारी) 4 लाख 59 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. शुक्रवारी नवीन कोरोना रुग्णसंख्या 4 लाख 90 हजार या सर्वाधिक संख्येपर्यंत पोहचली होती, मात्र त्यानंतर गेले तीन दिवस सातत्याने नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत होती. त्यात काल अचानक पुन्हा वाढ दिसून येत आहे. रुग्णसंख्येत भर पडत असली तरी गंभीर अथवा चिंताजनक रुग्णांचे प्रमाण पाऊण टक्क्यापर्यंत कमी झाले आहे. 

जगातील कोरोनाचा मृत्यूदर सातत्याने थोडा-थोडा कमी होत 2.65 टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी नवीन कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण मात्र आता थोडे घसरताना तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढताना दिसत आहे. सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढून 24 टक्के झाले आहे.

वाचा एमपीसी न्यूज – अंतरंगचा दसरा विशेषांक

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 42 लाख 36 हजार 898 झाली असून आतापर्यंत एकूण 11 लाख 71 हजार 337 (2.65 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 44 हजार 162 (73.34 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 1 कोटी 06 लाख 21 हजार 399 (24.01 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1 कोटी 05 लाख 41 हजार 477 (99.25 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 79 हजार 922 (0.75 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

21 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 37 हजार 441, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 84 हजार 881, मृत्यू 6 हजार 855

22 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 78 हजार 132, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 73 हजार 730, मृत्यू 6 हजार 470

23 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 90 हजार 059, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 40 हजार 199,  मृत्यू 6 हजार 531

24 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 52 हजार 886, नवीन कोरोनामुक्त 2 कोटी 41 हजार 101,  मृत्यू 5 हजार 598

25 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 23 हजार 715, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 36 हजार 197,  मृत्यू 4 हजार 609

26 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 11 हजार 372, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 76 हजार 499,  मृत्यू 5 हजार 110

27 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 59 हजार 020, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 69 हजार 574,  मृत्यू 7 हजार 028

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.