Corona World Update: सक्रिय रुग्णांपैकी 99 टक्के रुग्णांमध्ये सौम्य संसर्ग

Corona World Update: Mild infections in 99 percent of active patients गंभीर रुग्णांची टक्केवारी सुमारे पाच टक्क्यांवरून एक टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, ही फार मोठी आशादायक बाब असल्याचे मानले जाते. 

एमपीसी न्यूज – जगातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला असला तरी त्यापैकी 98.82 टक्के रुग्णांमध्ये हा आजार सौम्य प्रकारातील असून केवळ 1.18 टक्के रुग्ण गंभीर अथवा चिंताजनक अवस्थेत आहेत. गंभीर रुग्णांची टक्केवारी सुमारे पाच टक्क्यांवरून एक टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, ही फार मोठी आशादायक बाब असल्याचे मानले जाते. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 34 लाख 56 हजार 347 झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 81 हजार 154 (4.32 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 78 लाख 47 हजार 111 (58.32 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 50 लाख 28 हजार 082 (37.37 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 49 लाख 68 हजार 508 (98.82 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 59 हजार 574  (1.18 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

8 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 13 हजार 280, कोरोनामुक्त 1 लाख 80 हजार 299, मृतांची संख्या 5 हजार 518

9 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 22 हजार 825, कोरोनामुक्त 1 लाख 56 हजार 623, मृतांची संख्या 5 हजार 404

10 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 36 हजार 918,  कोरोनामुक्त 1 लाख 47 हजार 743, मृतांची संख्या 5 हजार 416

11 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 14 हजार 786,  कोरोनामुक्त 1 लाख 45 हजार 522, मृतांची संख्या 5 हजार 015

12 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 94 हजार 677,  कोरोनामुक्त 1 लाख 02 हजार 610, मृतांची संख्या 3 हजार 956

13 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 95 हजार 878,  कोरोनामुक्त 1 लाख 13 हजार 919, मृतांची संख्या 3 हजार 731

14 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 16 हजार 806, कोरोनामुक्त 1 लाख 50 हजार 025, मृतांची संख्या 5 हजार 346

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 35 लाखांच्या वर

अमेरिकेत मंगळवारी 65 हजार 594 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 35 लाख 45 हजार 077 झाली आहे. मंगळवारी अमेरिकेत 935 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 39 हजार 143 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 16 लाख 195 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 18 लाख 05 हजार 739 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये मंगळवारी 1,341 कोरोना बळी

ब्राझीलमध्ये मंगळवारी 1,341 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 74 हजार 262 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 19 लाख 31 हजार 204 झाली असून त्यापैकी 12 लाख 13 हजार 512 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 6 लाख 43 हजार 430 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 35 हजारांवर

मेक्सिकोत मंगळवारी 485 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 35 हजार 491 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 3 लाख 04 हजार 435 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 1 लाख 89 हजार 063 रुग्ण बरे झाले असून 79 लाख 881 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात मंगळवारी 588 कोरोना बळी

भारतात मंगळवारी 588 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. इराणमध्ये 179, रशिया व पेरूमध्ये प्रत्येकी 175, दक्षिण अफ्रिकेत 174 तर इंग्लंडमध्ये 138 कोरोना बळी गेले. इराकमध्ये 95, इजिप्तमध्ये 73, अर्जेंटिनामध्ये 65, बोलिवियात 59, ग्वाटेमालामध्ये58 तर पाकिस्तान व इंडोनेशियात प्रत्येकी 54 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

मेक्सिको सातव्या तर दक्षिण अफ्रिका नवव्या स्थानावर

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत स्पेनला मागे टाकत मेक्सिको सातव्या स्थानावर तर इंग्लंडला मागे टाकत दक्षिण अफ्रिका नवव्या स्थानावर पोहचला आहे. आता स्पेन आठव्या तर इंग्लंड दहाव्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 35,45,077 (+65,594), मृत 139,143 (+935)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 19,31,204 (+43,245), मृत 74,262 (+1,341)
  3. भारत – कोरोनाबाधित 9,37,487 (+29,842) , मृत 24,315 (+588)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,39,947 (+6,248), मृत 11,614 (+175)
  5. पेरू – कोरोनाबाधित 3,33,867 (+3,744), मृत 12,229 (+175)
  6. चिली – कोरोनाबाधित 3,19,493 (+1,836), मृत 7,069 (+45)
  7. मेक्सिको – कोरोनाबाधित 3,04,435 (+4,685), मृत 35,491 (+485)
  8. स्पेन –  कोरोनाबाधित 303,699 (+666), मृत 28,409 (+3)
  9. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 2,98,292 (+10,496), मृत 4,346 (+174)
  10. इंग्लंड – कोरोनाबाधित 2,91,373 (+398), मृत 44,968 (+138)
  11. इराणकोरोनाबाधित 2,62,173 (+2,521), मृत 13,211 (+179)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,53,604 (+1,979), मृत 5,320 (+54)
  13. इटली – कोरोनाबाधित 2,43,344 (+114), मृत 34,984 (+17)
  14. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,37,803 (+2,692), मृत 2,283 (+40)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,14,993 (+992) मृत 5,402 (+20)
  16. जर्मनी – कोरोनाबाधित 2,00,766 (+330), मृत 9,144 (+5)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,90,057 (+3,163), मृत 2,424 (+33)
  18. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,72,377 (+0), मृत 30,029 (+0)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,59,898 (+5,621), मृत 5,625 (+170)
  20. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,08,486 (+331), मृत 8,798 (+8)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.