Corona World Update: नवा उच्चांक नव्या रुग्णांचा आणि कोरोनामुक्तांचाही!

Corona World Update: New highs for new patients and corona free! कोरोनामुक्तांची टक्केवारी 59.38 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 4.25 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 36.37 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

एमपीसी न्यूज – जगातील सुमारे एक कोटी 39 लाख कोरोनाबाधितांपैकी 82.84 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी 59.38 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 4.25 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 36.37 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. काल (गुरुवारी) जगभरात 2 लाख 48 हजार 914 नव्या रुग्णांची भर पडली त्याच वेळी 2 लाख 41 हजार 335 रुग्ण कोरोनामुक्त झाले. हे दोन्ही आतापर्यंतचे उच्चांक आहेत.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 39 लाख 52 हजार 120 झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 92 हजार 745 (4.25 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 82 लाख 84 हजार 260 (59.38 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 50 लाख 75 हजार 115 (36.37 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 50 लाख 15 हजार 228 (98.82 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 59 हजार 887 (1.18 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

10 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 36 हजार 918,  कोरोनामुक्त 1 लाख 47 हजार 743, मृतांची संख्या 5 हजार 416

11 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 14 हजार 786,  कोरोनामुक्त 1 लाख 45 हजार 522, मृतांची संख्या 5 हजार 015

12 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 94 हजार 677,  कोरोनामुक्त 1 लाख 02 हजार 610, मृतांची संख्या 3 हजार 956

13 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 95 हजार 878,  कोरोनामुक्त 1 लाख 13 हजार 919, मृतांची संख्या 3 हजार 731

14 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 16 हजार 806, कोरोनामुक्त 1 लाख 50 हजार 025, मृतांची संख्या 5 हजार 346

15 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 34 हजार 302, कोरोनामुक्त 1 लाख 89 हजार 633, मृतांची संख्या 5 हजार 755

16 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 48 हजार 914, कोरोनामुक्त 2 लाख 41 हजार 335, मृतांची संख्या 5 हजार 741

अमेरिकेत एका दिवसात 73 हजार 388 नवीन रुग्णांची वाढ

अमेरिकेत गुरूवारी 73 हजार 388 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36 लाख 9 हजार 025 झाली आहे. गुरुवारी अमेरिकेत 963 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 41 हजार 118 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 16 लाख 79 हजार 633 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 18 लाख 74 हजार 274 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांवर 

ब्राझीलमध्ये  गुरुवारी 1,299 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 76,822 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 20,14,738 झाली असून त्यापैकी 13,66,775 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 5,71,141 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोतील गुरुवारी 579 कोरोना बळी

मेक्सिकोत गुरुवारी 579 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 36,906 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 3,17,635 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 1,99,129 रुग्ण बरे झाले असून 81,600 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात बुधवारी 614 कोरोना बळी

भारतात गुरुवारी 680 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. दक्षिण अफ्रिकेत 216, कोलंबियात 215, इराण व पेरूमध्ये प्रत्येकी 198, रशियात 167 तर चिलीत 104 कोरोना बळी गेले. इराकमध्ये 90, इंडोनेशियात 76, इंग्लंडमध्ये 66, अर्जेंटिनामध्ये 62, ग्वाटेमालामध्ये 54, इजिप्तमध्ये 53 तर इक्वाडोरमध्ये 49 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

दक्षिण अफ्रिकचे सहाव्या स्थानावर उडी

सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत इंग्लंड आणि स्पेन पाठोपाठ मेक्सिको व चिलीला मागे टाकत दक्षिण अफ्रिकेने आठव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर उडी घेतली आहे. मंगळवारी इंग्लंडला मागे टाकत दक्षिण अफ्रिका नवव्या स्थानावर पोहचला होता. बुधवारी दक्षिण अफ्रिकेने स्पेनला मागे टाकत आठवे स्थान मिळवले. गुरुवारी मेक्सिको आणि चिलीलाही मागे टाकत सहाव्या स्थानावर उडी घेतली. आता चिली सातव्या तर मेक्सिको आठव्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 36,95,025 (+73,388), मृत 1,41,118 (+963)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 2,014,738 (+43,829), मृत 76,822 (+1,299)
  3. भारत – कोरोनाबाधित 10,05,637 (+35,468) , मृत 25,609 (+680)
  4. रशिया – कोरोनाबाधित 7,52,797 (+6,428), मृत 11,937 (+167)
  5. पेरू – कोरोनाबाधित 3,41,586 (+3,862), मृत 12,615 (+198)
  6. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 32,4,221 (+13,172), मृत 4,669 (+216)
  7. चिली – कोरोनाबाधित 3,23,698 (+2,493), मृत 7,290 (+104)
  8. मेक्सिको – कोरोनाबाधित 3,17,635 (+6,149), मृत 36,906 (+579)
  9. स्पेन –  कोरोनाबाधित 3,05,935 (+1,361), मृत 28,416 (+3)
  10. इंग्लंड – कोरोनाबाधित 2,92,552 (+641), मृत 45,119 (+66)
  11. इराणकोरोनाबाधित 2,67,061 (+2,500), मृत 13,608 (+198)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 257,914 (+2,145), मृत 5,426 (+40)
  13. इटली – कोरोनाबाधित 243,736 (+230), मृत 35,017 (+20)
  14. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 2,43,238 (+2,764), मृत 2,370 (+45)
  15. टर्की – कोरोनाबाधित 2,16,873 (+933) मृत 5,440 (+21)
  16. जर्मनी – कोरोनाबाधित 201,836 (+584), मृत 9,157 (+9)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,96,323 (+2,733), मृत 2,496 (+39)
  18. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,73,838 (+534), मृत 30,138 (+18)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,73,206 (+8,037), मृत 6,029 (+215)
  20. अर्जेंटिना –  कोरोनाबाधित 1,14,783 (+3,637), मृत 2,112 (+62)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.