Corona World Update: कोरोनाबाधितांची संख्या तीन कोटींच्या उंबरठ्यावर, जगातील 17 टक्के कोरोनाबाधित भारतात

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 50 लाखांच्या पुढे, अमेरिकेतील कोरोना बळींच्या आकड्याने ओलांडला दोन लाखांचा टप्पा

MPC News (Vivek Inamdar) –  जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता तीन कोटींच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. नव्या कोरोनाबाधितांमधील भारतातील रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जगातील सुमारे 17 टक्के कोरोनाबाधित भारतात असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. अमेरिकेतील कोरोना बळींच्या आकड्याने काल दोन लाखांचा टप्पा ओलांडला. कोरोना विषाणूचा आतापर्यंत जगातील 2 कोटी 97 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून त्यापैकी 2 कोटी 15 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बळींच्या आकडा 9 लाख 39 हजारांच्या पुढे गेला आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण 72.46 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 24.38 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.  

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 2 कोटी 97 लाख 24 हजार 918 झाली असून आतापर्यंत एकूण 9 लाख 39 हजार 185 (3.16 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 15 लाख 39 हजार 109 (72.46 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 72 लाख 46 हजार 624 (24.38 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 71 लाख 85 हजार 709 (99.16 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 60 हजार 915 (0.84 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

जगातील 60 टक्के कोरोनाबाधित हे अमेरिका, भारत, ब्राझील, रशिया आणि पेरू या पाच देशांमध्ये आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 22.84 टक्के कोरोनाबाधित अमेरिकेत आढळले तर त्याखालोखाल 16.88 टक्के कोरोनाबाधित भारतात आढळून आले आहेत. ब्राझीलमध्ये जगातील 14.75 टक्के कोरोनाबाधितांची नोंद झाली. रशियात 3.61 टक्के तर पेरूमध्ये 2.48 टक्के कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. नव्या कोरोनाबाधितांमध्ये 40 टक्क्यांहून अधिक रुग्ण भारतात सापडत आहेत. भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

मागील दोन दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

14 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 42 हजार 856, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 48 हजार 690, मृत्यू 4 हजार 379

15 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 78 हजार 856 , नवीन कोरोनामुक्त 2 लाख 61 हजार 765, मृत्यू 6 हजार 005

 

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

 

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.