Corona World Update: 1.56 कोटींपैकी 95 लाख रुग्ण बरे, कोरोनामुक्तांचे प्रमाण 61 टक्के!

Corona World Update: Out of 1.56 crore, 95 lakh patients are cured, the proportion of corona free is 61%! कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 4.07 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 35.01 टक्क्यांपर्यंत खाली

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 56 लाखांच्या पुढे गेली असून त्यापैकी 95 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी 60.92 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. कोरोना बळींचा आकडा सहा लाख 36 हजारांच्या पुढे गेला असला तरी कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 4.07 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 35.01 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. काल (गुरुवारी) जगभरात 2 लाख 76 हजार नवीन कोरोना रुग्णांची भर पडली तर 1 लाख 85 हजार हजारपेक्षा अधिक कोरोनामुक्त झाले.  

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 56 लाख 51 हजार 911 झाली असून आतापर्यंत एकूण 6 लाख 36 हजार 470 (4.07 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 95 लाख 35 हजार 342 (60.92 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 54 लाख 80 हजार 099 (35.01 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 54 लाख 13 हजार 843 (98.79 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 66 हजार 256 (1.31 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

17 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 40 हजार 681, कोरोनामुक्त 1 लाख 76 हजार 369, मृतांची संख्या 5 हजार 583

18 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 24 हजार 065, कोरोनामुक्त 1 लाख 51 हजार 019, मृतांची संख्या 5 हजार 008

19 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 20 हजार 073, कोरोनामुक्त 1 लाख 23 हजार 557, मृतांची संख्या 4 हजार 316

20 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 05 हजार 348 , कोरोनामुक्त 1 लाख 71 हजार 684 , मृतांची संख्या 4 हजार 046

21 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 39 हजार 093 , कोरोनामुक्त 2 लाख 03 हजार 626 , मृतांची संख्या 5 हजार 678

22 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 79 हजार 769 , कोरोनामुक्त 2 लाख 39 हजार 108 , मृतांची संख्या 7 हजार 113

23 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 76 हजार 000 , कोरोनामुक्त 1 लाख 85 हजार 387 , मृतांची संख्या 6 हजार 309

अमेरिकेतील कोरोना संसर्ग 42 लाखांच्या उंबरठ्यावर 

अमेरिकेत गुरुवारी 69 हजार 116 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 41 लाख 69 हजार 991 झाली आहे. गुरुवारी अमेरिकेत 1 हजार 150 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील कोरोना बळींचा आकडा 1 लाख 47 हजार 333 पर्यंत वाढला आहे. अमेरिकेत 19 लाख 79 हजार 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून अमेरिकेत 20 लाख 43 हजार 041 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

ब्राझीलमध्ये गुरुवारी 1 हजार 317 कोरोना बळी

ब्राझीलमध्ये गुरुवारी 1 हजार 317 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा आकडा 84 हजार 207 वर पोहचला आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 89 हजार 951 झाली असून त्यापैकी 15 लाख 70 हजार 237 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आता ब्राझीलमध्ये 6 लाख 35 हजार 507 सक्रिय कोरोना रुग्ण उरले आहेत.

मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 41,190 वर

मेक्सिकोत गुरुवारी 790 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 41 हजार 190 झाला आहे. मेक्सिकोतील कोरोना संसर्ग आता 3 लाख 62 हजार 274 पर्यंत वाढला आहे. त्यापैकी 2 लाख 31 हजार 403 रुग्ण बरे झाले असून 89 हजार 681 रुग्ण सक्रिय आहेत.

भारतात गुरुवारी 755 कोरोना बळी

भारतात गुरुवारी 755 कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद झाली. कोलंबियात 315, इराणमध्ये 221, पेरूत 199, दक्षिण अफ्रिकेत 153, रशियात 147, अर्जेंटिना व इंडोनेशियात प्रत्येकी 117 तर चिलीत 116 कोरोना बळी गेले. ग्वाटेमालामध्ये 59, बोलिवियात 55, इंग्लंडमध्ये 53 तर बांगलादेशमध्ये 50 कोरोना मृत्यू नोंदविले गेले.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 41,69,991 (+69,116), मृत 147,333 (+1,150)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 2,289,951 (+58,080), मृत 84,207 (+1,317)
  3. भारत – कोरोनाबाधित 1,288,130 (+48,446) , मृत 30,645 (+755)
  4. रशिया – कोरोनाबाधित 795,038 (+5,848), मृत 12,892 (+147)
  5. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 408,052 (+13,104), मृत 6,093 (+153)
  6. पेरू – कोरोनाबाधित 371,096 (+4,546), मृत 17,654 (+199)
  7. मेक्सिको – कोरोनाबाधित 362,274 (+6,019), मृत 41,190 (+790)
  8. चिली – कोरोनाबाधित 338,759 (+2,357), मृत 8,838 (+116)
  9. स्पेन –  कोरोनाबाधित 317,246 (+2,615), मृत 28,429 (+3)
  10. इंग्लंड – कोरोनाबाधित 297,146 (+769), मृत 45,554 (+53)
  11. इराणकोरोनाबाधित 284,034 (+2,621), मृत 15,074 (+221)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 269,191 (+1,763), मृत 5,709 (+32)
  13. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 260,394 (+2,238), मृत 2,635 (+34)
  14. इटली – कोरोनाबाधित 245,338 (+306), मृत 35,092 (+10)
  15. कोलंबिया – कोरोनाबाधित 226,373 (+7,945), मृत 7,688 (+315)
  16. टर्की – कोरोनाबाधित 223,315 (+913) मृत 5,563 (+18)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 216,110 (+2,856), मृत 2,801 (+50)
  18. जर्मनी – कोरोनाबाधित 205,142 (+672), मृत 9,187 (+5)
  19. फ्रान्स – कोरोनाबाधित 179,398 (+1,062), मृत 30,182 (+10)
  20. अर्जेंटिना –  कोरोनाबाधित 148,027 (+6,127), मृत 2,702 (+114)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.