Corona World Update: रशियाला मागे टाकत जागतिक क्रमवारी भारत तिसऱ्या स्थानावर

Corona World Update: Out of 115 lakhs, more than 65 lakhs are cured, about 45 lakhs are active patients जगातील 56,55 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, 4.65 टक्के रुग्णांचा मृत्यू, 38.80 टक्के सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत रशियाला मागे टाकत भारत तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. भारतातील कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या सात लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. जगातील 6.04 टक्के कोरोना रुग्ण भारतात आहेत. आतापर्यंत सुमारे सव्वाचार लाख (सुमारे 61 टक्के) रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अडीच लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात  आतापर्यंत एकूण 19 हजार 700 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. हा मृत्यूदर 2.82 टक्के आहे. जागतिक सरासरीपेक्षा तो बराच कमी आहे, ही थोडी दिलासा देणारी बाब आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 15 लाख 56 हजार 681 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 5 लाख 36 हजार 776 (4.65 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 65 लाख 35 हजार 492 (56.55 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 44 लाख 84 हजार 413 (38.80 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 44 लाख 25 हजार 873 (98.69 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 58 हजार 540 (1.31 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

27 जून – नवे रुग्ण 1 लाख 76 हजार 568, कोरोनामुक्त 1 लाख 01 हजार 108, मृतांची संख्या 4 हजार 547

28 जून – नवे रुग्ण 1 लाख 63 हजार 172, कोरोनामुक्त 95 हजार 410, मृतांची संख्या 3 हजार 454

29 जून – नवे रुग्ण 1 लाख 60 हजार 985, कोरोनामुक्त 1 लाख 09 हजार 374, मृतांची संख्या 3 हजार 415

30 जून – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 814, कोरोनामुक्त 1 लाख 31 हजार 375, मृतांची संख्या 5 हजार 062

1 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 96 हजार 901, कोरोनामुक्त 1 लाख 32 हजार 758, मृतांची संख्या 4 हजार 847

2 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 08 हजार 864, कोरोनामुक्त 2 लाख 278 , मृतांची संख्या 5 हजार 155

3 जुलै – नवे रुग्ण 2 लाख 09 हजार 028, कोरोनामुक्त 1 लाख 34 हजार 276 , मृतांची संख्या 5 हजार 170

4 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 89 हजार 413, कोरोनामुक्त 1 लाख 41 हजार 408 , मृतांची संख्या 4 हजार 489

5 जुलै – नवे रुग्ण 1 लाख 75 हजार 499, कोरोनामुक्त 97 हजार 176 , मृतांची संख्या 3 हजार 572

अमेरिकेतील कोरोना संसर्ग 30 लाखांच्या उंबरठ्यावर

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (रविवारी) 44 हजार 530 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 29 लाख 82 हजार 928 झाली आहे. रविवारी 251 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाली आहे. हा गेल्या तीन महिन्यांतील सर्वांत कमी आकडा आहे. यापूर्वी 23 मार्चला 181 मृत्यूंची नोंद आहे. त्यानंतर 21 जूनला 271 तर 28 जूनला 285 कोरोना मृत्यू झाले होते. शनिवारी हा आकडा 254 पर्यंत खाली आला होता. मृतांचा एकूण आकडा 1 लाख 32 हजार 569 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 12 लाख 89 हजार 564 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 15 लाख 60 हजार 795 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये बळींचा आकडा 65 हजारांच्या उंबरठ्यावर!

ब्राझीलमध्ये रविवारी 535 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 64 हजार 900 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 16 लाख 04 हजार 585 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी 9 लाख 78 हजार 615 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 61 हजार 070 झाली आहे.

मेक्सिकोतील कोरोना बळींचा आकडा 30 हजारांच्या पुढे

रविवारी मेक्सिकोत 523 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. मेक्सिकोतील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 52 हजार 165 झाली असून त्यापैकी 1 लाख 52 हजार 309 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 30 हजार 366 कोरोना बळी गेले आहे. त्यामुळे आता मेक्सिकोत 69 हजार 490 सक्रिय रुग्ण उरले आहेत.

भारतात रविवारी 421 कोरोना मृत्यूंची नोंद

भारतात रविवारी 421 कोरोना बळींची नोंद झाली आहे. पेरूमध्ये 177, दक्षिण अफ्रिकेत 173, इराणमध्ये 163, रशियात 134, कोलंबियात 122, चिलीत 116 तर इराकमध्ये 105 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. पाकिस्तानात 93, इंडोनेशियात 82, इजिप्तमध्ये 63, सौदी अरेबिया व बोलिवियात प्रत्येकी 58 तर बांगलादेशमध्ये 55 बळी गेले आहेत.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 29,82,928 (+44,530), मृत 1,32,569 (+251)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 16,04,585 (+26,209), मृत 64,900 (+535)
  3. भारत – कोरोनाबाधित 6,97,836 (+23,932) , मृत 19,700 (+421)
  4. रशिया – कोरोनाबाधित 6,81,251 (+6,736), मृत 10,161 (+134)
  5. पेरू – कोरोनाबाधित 3,02,718 (+3,638), मृत 10,589 (+177)
  6. स्पेन –  कोरोनाबाधित 2,97,625 (+0), मृत 28,385 (+0)
  7. चिली – कोरोनाबाधित 2,95,532 (+3,685), मृत 6,308 (+116)
  8. यू. के. – कोरोनाबाधित 2,85,416 (+516), मृत 44,220 (+22)
  9. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,52,165 (+6,914), मृत 30,366 (+523)
  10. इटली – कोरोनाबाधित 2,41,611 (+192), मृत 34,861 (+7)
  11. इराण – कोरोनाबाधित 2,40,438 (+2,560), मृत 11,571 (+163)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 2,28,474 (+3,191), मृत 4,712 (+93)
  13. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 209,509 (+3,580), मृत 1,916 (+58)
  14. टर्की – कोरोनाबाधित 2,05,758 (+1,148) मृत 5,225 (+19)
  15. जर्मनी – कोरोनाबाधित 1,97,558 (+140), मृत 9,086 (+5)
  16. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 1,96,750 (+8,773), मृत 3,199 (+173)
  17. फ्रान्स – कोरोनाबाधित 166,960 (+0), मृत 29,893 (+0)
  18. बांगलादेशकोरोनाबाधित 1,62,417 (+2,738), मृत 2,052 (+55)
  19. कोलंबिया – कोरोनाबाधित 1,17,110 (+3,721), मृत 4,064 (+122)
  20. कॅनडा –  कोरोनाबाधित 105,536 (+219), मृत 8,684 (+10)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.