Corona World Update: एकूण 54 लाख कोरोनाबाधितांपैकी उरलेत 28 लाख म्हणजे 52 टक्के सक्रिय कोरोना रुग्ण

Corona World Update: Out of 54 lakh corona patients, the remaining 28 lakh or 52% are active corona patients. 22 लाख 47 हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात तर 3 लाख 43 हजार कोरोनाबाधितांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जगभरात सलग तीन दिवस दररोज एक लाखांपेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण वाढ झाल्यानंतर काल (शनिवारी) ही संख्या एक लाखांपेक्षा कमी झाल्याने जगाला किंचितसा दिलासा मिळाला आहे. याच काळात 22 मेला जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत तब्बल एक लाख सात हजार 521 कोरोना रुग्णांची भर पडली. हा एक दिवसातील कोरोनावाढीचा उच्चांक होता. मात्र कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या व टक्केवारी सातत्याने वाढत आहे. परिणामी जगातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या टक्केवारीत घट सुरूच असल्याचे सकारात्मक संकेतही मिळत आहे. दिवसात होणाऱ्या कोरोना मृत्यूंंच्या संख्येचा मागील चार दिवसांत वर-वर चाललेला आलेख शनिवारी खाली आला आहे. जागतिक मृत्यूदरातही सातत्याने घट होत आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 54 लाख 02 हजार 264 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 43 हजार 823 (6.36 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 22 लाख 47 हजार 237 (41.60 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 28 लाख 11 हजार 204 (52.04 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 27 लाख 57 हजार 642 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 562 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

17 मे – नवे रुग्ण 82 हजार 257 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 618

18 मे – नवे रुग्ण 88 हजार 858 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 445

19 मे – नवे रुग्ण 94 हजार 813 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 589

20 मे – नवे रुग्ण 1 लाख 474 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 685

21 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 934

22 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 252

23 मे – नवे रुग्ण 99 हजार 938 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 183

अमेरिकेत कोरोना बळींची संख्या एक लाखाच्या उंबरठ्यावर

अमेरिकेत शनिवारी 1,036 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 98 हजार 683 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 16 लाख 66 हजार 828 झाली आहे तर 4 लाख 46 हजार 914 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये काल (शनिवारी) 965, मेक्सिको 479 तर इंग्लंडमध्ये 282 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. भारत 142, रशिया 139, पेरू 129, कॅनडा 105, स्वीडन 67, इराण 59 तर स्पेनमध्ये 50 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक क्रमवारीत ब्राझील आता दुसऱ्या स्थानावर

दक्षिण अमेरिकेतील ब्राझील या देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत रशियाला मागे टाकत ब्राझील आता दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्येने साडेतीन लाखांच्या उंबरठ्यावर आहे तर कोरोना बळींच्या आकड्याने 22 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

ब्राझीलमध्ये गुरुवारी 16 हजार 508 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्याच बरोबर काल एका दिवसात 965 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना बळींचा एकूण आकडा 22 हजार 13 पर्यंत वाढला आहे. गेल्या पाच दिवसात ब्राझीलमध्ये मृत्यूने थैमान घातले आहे. मंगळवारी 1130 कोरोना बळी गेली. बुधवारी हा आकडा 911 पर्यंत खाली आला आणि गुरूवारी एकदम 1188 पर्यंत वाढला आहे. त्यानंतर शुक्रवारी 966 आणि शनिवारी 965 कोरोना मृतांची नोंद झाली आहे.

उत्तर अमेरिकेतील कॅनडा या देशाने चीनला मागे टाकत 13 वे स्थान मिळविले आहे. सुरुवातीला प्रथम क्रमांकावर असणारा चीन आता 14 व्या स्थानावर गेला आहे. जागतिक क्रमवारीत भारत 11 व्या तर पाकिस्तान 19 व्या स्थानावर कायम आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

 1. अमेरिका – कोरोनाबाधित 16,66,828 (+21,929), मृत 98,683 (+1,036)
 2. ब्राझील – कोरोनाबाधित 3,47,398(+16,508), मृत 22,013 (+965)
 3. रशिया – कोरोनाबाधित 3,35,882 (+9,434), मृत 3,388 (+139)
 4. स्पेन – कोरोनाबाधित 282,370 (+466), मृत 28,678 (+50)
 5. यू. के. – कोरोनाबाधित 2,57,154 (+2,959), मृत 36,675 (+282)
 6. इटली – कोरोनाबाधित 2,29,327 (+669), मृत 32,735 (+119)
 7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,82,469 (+250), मृत 28,332 (+43)
 8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,79,986 (+273), मृत 8,366 (+14)
 9. टर्की – कोरोनाबाधित 1,55,686 (+1,186), मृत 4,308 (+32)
 10. इराण – कोरोनाबाधित 1,33,521 (+1,869), मृत 7,359 (+59)
 11. भारत – कोरोनाबाधित 1,31,423 (+6,629) , मृत 3,868 (+142)
 12. पेरू –  कोरोनाबाधित 1,15,754 (+4,056) , मृत 3,373 (+129)
 13. कॅनडा –  कोरोनाबाधित 81,324 (+1,182), मृत 6,152 (+121)
 14. चीन – कोरोनाबाधित 82,971 (NA), मृत 4,634 (NA)
 15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 70 हजार 161 (+2,442) मृत 379 (+15)
 16. चिली – कोरोनाबाधित 65,393 (+3,536), मृत 673 (+43)
 17. मेक्सिको – कोरोनाबाधित 62,527 (+2,960), मृत 6,989 (+479)
 18. बेल्जियम – कोरोनाबाधित 56,810 (+299), मृत 9,237 (+25)
 19. पाकिस्तान – कोरोनाबाधित 52,437 (+1,743), मृत 1,101 (+34)
 20. नेदरलँड – कोरोनाबाधित 45,064 (+176), मृत 5,811 (+23)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III