Corona World Update: 24 तासांत सर्वाधिक पाच लाखांपेक्षा अधिक रुग्णांची भर, पण पाऊण टक्के रुग्णांनाच गंभीर संसर्ग

जगातील 73.13 टक्के रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर 2.63 टक्के, मात्र सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात 24.24 टक्क्यांपर्यंत वाढ

एमपीसी न्यूज –  जगभरात काल (बुधवारी) 5 लाख 4 हजार 419 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. आतापर्यंतचा एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. शुक्रवारी नवीन कोरोना रुग्णसंख्या 4 लाख 90 हजार या सर्वाधिक संख्येपर्यंत पोहचली होती, मात्र त्यानंतर काही दिवस सातत्याने नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत होती. त्यात मागील दोन दिवसांत अचानक पुन्हा वाढ दिसून येत आहे. रुग्णसंख्येत भर पडत असली तरी गंभीर अथवा चिंताजनक रुग्णांचे प्रमाण पाऊण टक्क्यापर्यंत कमी झाले आहे. 

जगातील कोरोनाचा मृत्यूदर सातत्याने थोडा-थोडा कमी होत 2.63 टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी नवीन कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण मात्र आता थोडे घसरताना तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढताना दिसत आहे. सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढून 24.24 टक्के झाले आहे.

वाचा एमपीसी न्यूज – अंतरंगचा दसरा विशेषांक

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 47 लाख 49 हजार 782 झाली असून आतापर्यंत एकूण 11 लाख 79 हजार 079 (2.63 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 27 लाख 25 हजार 332 (73.13 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 1 कोटी 08 लाख 45 हजार 371 (24.24 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1 कोटी 07 लाख 64 हजार 174 (99.25 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 81 हजार 197 (0.75 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

22 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 78 हजार 132, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 73 हजार 730, मृत्यू 6 हजार 470

23 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 90 हजार 059, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 40 हजार 199,  मृत्यू 6 हजार 531

24 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 52 हजार 886, नवीन कोरोनामुक्त 2 कोटी 41 हजार 101,  मृत्यू 5 हजार 598

25 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 23 हजार 715, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 36 हजार 197,  मृत्यू 4 हजार 609

26 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 11 हजार 372, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 76 हजार 499,  मृत्यू 5 हजार 110

27 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 4 लाख 59 हजार 020, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 69 हजार 574,  मृत्यू 7 हजार 028

28 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 5लाख 04 हजार 419, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 76 हजार 406,  मृत्यू 7 हजार 104

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

 

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.