Corona World Update: कोरोनामुक्तांची टक्केवारी 75.32 वर, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 21.76 टक्क्यांवर!

3.60 कोटी रुग्णांपैकी 2.71 कोटी रुग्णांची कोरोनावर मात, कोरोना बळींचा आकडा साडेदहा लाखांच्या पुढे, सक्रिय रुग्ण संख्या 78.41 लाख

एमपीसी न्यूज –  जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या तीन कोटी 60 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत दोन कोटी 71 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 75.32 टक्के झाले आहे. मृत्यूदर 2.93 टक्क्यांपर्यंत कमी झाला असून सक्रिय रुग्णांचे प्रमाण सुमारे 21.76 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 60 हजार 41 हजार 783 झाली असून आतापर्यंत एकूण 10 लाख 54 हजार 604 (2.93 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 71 लाख 45 हजार 526 (75.32 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 78 लाख 41 हजार 653 (21.76 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 77 लाख 73 हजार 832  (99.14 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 67 हजार 821 (0.86 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

30 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 13 हजार 858, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 82 हजार 684, मृत्यू 6 हजार 209

1 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 19 हजार 406, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 39 हजार 272, मृत्यू 8 हजार 922

2 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 16 हजार 256, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 24 हजार 867, मृत्यू 5 हजार 603

3 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 94 हजार 378, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 30 हजार 289, मृत्यू 4 हजार 791

4 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 49 हजार 546, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 32 हजार 558, मृत्यू 4 हजार 013

5 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 64 हजार 208, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 50 हजार 257, मृत्यू 4 हजार 250

6 ऑक्टोबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 11 हजार 613, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 74 हजार 961, मृत्यू 5 हजार 553

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.