Corona World Update: एका दिवसात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 16 हजार 304 नवे रुग्ण, मृतांच्या संख्येत मात्र घट

Corona World Update: Record 1,16,304 new patients in a Single day, however, the number of deaths decreased

एमपीसी न्यूज – जगात काल (गुरुवारी) कोरोनाच्या नव्या 1 लाख 16 हजार 304 रुग्णांची भर पडली. एका दिवसातील आतापर्यंतचा हा नव्या कोरोना रुग्णांचा उच्चांक आहे. एका दिवसातील मृतांचा आकड्यात मात्र घट झाली आहे. काल जगात एकूण 4 हजार 612 कोरोनामुक्तांचा मृत्यू झाला. जगातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 59 लाख 10 हजार 149 इतकी झाली आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण आता 43.71 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. जगातील हे सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण आता 50.16 टक्क्यांपर्यंत कमी आले आहे, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. 

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 59 लाख 10 हजार 149 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 62 हजार 114 (6.12 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 25 लाख 83 हजार 506 (43.71 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 29 लाख 64 हजार 529(50.16 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 29 लाख 10 हजार 554 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 975 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

22 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 252

23 मे – नवे रुग्ण 99 हजार 938 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 183

24 मे – नवे रुग्ण 96 हजार 505 दिवसभरातील मृतांची संख्या 2 हजार 826

25 मे – नवे रुग्ण 89 हजार 756 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 096

26 मे – नवे रुग्ण 92 हजार 060 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 048

27 मे – नवे रुग्ण 1 लाख 06 हजार 475 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 283

28 मे – नवे रुग्ण 1 लाख 16 हजार 304 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 177

अमेरिकेत मंगळवारी 1535 कोरोना बळी

अमेरिकेत गुरुवारी 1,223 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1,03,330 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 17 लाख 68 हजार 461 झाली आहे तर 4 लाख 98 हजार 725 म्हणजेच जवळजवळ पाच लाखजण कोरोनामुक्त झाले आहेत.

US Corona Death Toll: अमेरिकेत अवघ्या 88 दिवसांत कोरोनाचे 1,00,000 बळी!

ब्राझीलने ओलांडला कोरोनाबाधितांचा चार लाखांचा टप्पा

ब्राझीलमध्ये गुरूवारी 1,067 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 26 हजार 764 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 38 हजार 812 झाली आहे तर 1 लाख 93 हजार 181 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मेक्सिकोमध्ये काल (बुधवारी) 463, इंग्लंडमध्ये 377, भारतात 177 तर रशियात 174 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. पेरूमध्ये 116, कॅनडा 112,  इटली 70, फ्रान्स 66, इराणमध्ये 63 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 17,68,461 (+22,658), मृत 103,330 (+1,223)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 4,38,812 (+24,151), मृत 26,764 (+1,067)
  3. रशिया – कोरोनाबाधित 3,79,051 (+8,371), मृत 4,142 (+174)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 2,84,986 (+1,137), मृत 27,119 (+1)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 2,69,127 (+1,887), मृत 37,837 (+377)
  6. इटली – कोरोनाबाधित 2,31,732 (+593), मृत 33,142 (+70)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,86,238 (+3,325), मृत 28,662 (+66)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,82,452 (+557), मृत 8,570 (+37)
  9. भारत – कोरोनाबाधित 1,65,386 (+7,300) , मृत 4,711 (+177)
  10. टर्की – कोरोनाबाधित 1,60,979 (+1,182), मृत 4,461 (+30)
  11. इराण – कोरोनाबाधित 1,43,849 (+2,258), मृत 7,627 (+63)
  12. पेरू –  कोरोनाबाधित 1,41,779 (+5,874) , मृत 4,099 (+116)
  13. कॅनडा –  कोरोनाबाधित 88,512 (+993), मृत 6,877 (+112)
  14. चिली – कोरोनाबाधित 86,943 (+4,654), मृत 890 (+49)
  15. चीन – कोरोनाबाधित 82,995 (+2), मृत 4,634 (+0)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 80,185 (+1,644) मृत 441 (+16)
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 78,023 (+3,463), मृत 8,597 (+463)
  18. पाकिस्तान – कोरोनाबाधित 61,227 (+2,076), मृत 1,260 (+35)
  19. बेल्जियम – कोरोनाबाधित 57,849 (+257), मृत 9,388 (+24)
  20. कतार – कोरोनाबाधित 50,914 (+1,967), मृत 33 (+3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.