Corona World Update: दिलासादायक! कोरोना मृत्यूदरात दोन दिवसांत लक्षणीय घट, दिवसातील मृतांचा आकडा 3000 पर्यंत खाली

Corona World Update: Significant drop in corona mortality in last two days, daytime death toll down to 3000

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दिवसांत जगभरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात दररोज सरासरी साडेचार ते पाच हजार कोरोना बळी गेले आहेत. रविवारी ही संख्या 2,826 तर सोमवारी 3,096 मृत्यूंची नोंद झाल्याचे दिसून येत आहे. जगातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदरही 6.23 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, ही एक दिलासादायक बातमी आहे.

जगात 19 मार्चला एका दिवसात जगभरातील कोरोना मृत्यूंच्या संख्येने एक हजारचा टप्पा ओलांडला. त्यानंतर 24 तारखेला एका दिवसातील दोन हजार मृत्यूंचा टप्पा ओलांडला गेला. 27 मार्चला तीन हजारांचा टप्पा ओलांडला गेला. तर 30 मार्चला चार हजारचा टप्पा ओलांडला गेला. त्यानंतर दररोज चार हजार ते सात हजार दरम्यान मृतांचा आकडा कमी-जास्त होताना दिसत आहे.

स्पेनचा सोमवारचा कोरोनाबाधित नवे रुग्ण व मृत्यूंचा आकडा अद्यापि उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे सोमवारच्या जागतिक आकडेवारीत त्याचा समावेश नाही. तथापि, गेले कित्येक दिवस स्पेनमधील एका दिवसांतील मृतांचा आकडा 22 मेचा अपवाद वगळता 50 ते 100 च्या दरम्यान राहिलेला आहे. 22 मेला स्पेनमध्ये एकदम 688 मृत्यूंची नोंद झाली होती. स्पेनमधील सोमवारचा मृतांचा आकडा फार मोठा असण्याची शक्यता फारच कमी आहे.

जगात 17 एप्रिलला सर्वाधिक म्हणजे 8,429 कोरोना बळींची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसांपूर्वीपर्यंत चार हजार ते सव्वापाच हजारच्या दरम्यान हा आकडा होता, मात्र गेल्या दोन दिवसांत एक एकदम खाली आल्याचे दिसून येत आहे. यापूर्वीही काही वेळा मृत्यूंचा आकडा खाली आला, मात्र दोन-तीन दिवसांतच त्याने पुन्हा उसळी मारल्याचा इतिहास आहे. त्यामुळे आता खाली आलेला आकडा आणखी खाली जाणार की पुन्हा त्यात वाढ होणार या विषयी सर्वांच्या मनात धाकधूक आहे.

रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारी ईदचा सण होता. त्यामुळेही कदाचित कोरोना मृतांच्या नोंदी कमी झाल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे घटलेला मृत्यूदर मंगळवारी आणि पुढेही कायम राहणार का, याबाबत उत्सुकता आहे.

कोरोनाबाधितांची संख्या 55 लाखांवर, मृतांचा आकडा साडेतीन लाखांच्या उंबरठ्यावर

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 55 लाख 87 हजार 129 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 47 हजार 861 (6.23 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 23 लाख 65 हजार 645 (42.34 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 28 लाख 73 हजार 623 (51.43 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 28 लाख 20 हजार 456 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 167 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

19 मे – नवे रुग्ण 94 हजार 813 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 589

20 मे – नवे रुग्ण 1 लाख 474 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 685

21 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 934

22 मे – नवे रुग्ण 1 लाख 07 हजार 085 दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 252

23 मे – नवे रुग्ण 99 हजार 938 दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 183

24 मे – नवे रुग्ण 96 हजार 505 दिवसभरातील मृतांची संख्या 2 हजार 826

25 मे – नवे रुग्ण 89 हजार 756 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 096

अमेरिकेत कोरोना बळींची संख्या एक लाखाच्या उंबरठ्यावर

अमेरिकेत सोमवारी 505 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 99 हजार 805 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 17 लाख 06 हजार 226 झाली आहे तर 4 लाख 64 हजार 670 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये काल (सोमवारी) 965, मेक्सिको 215, पेरूमध्ये 173 तर भारतात 148 कोरोनाबाधितांचे बळी गेले आहेत. अमेरिका व कॅनडामध्ये प्रत्येकी 121, इक्वाडोर 95, रशिया व इटलीत प्रत्येकी 92, फ्रान्स 65, जर्मनी 57 तर दक्षिण अफ्रिकेत 52 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जगातील Top-20 मध्ये कतारचा समावेश 

आखाती देश कतारने जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या यादीत 20 वे स्थान मिळविले आहे. नेदरलँड हा देश आता Top-20 मधून बाहेर गेला आहे. जागतिक क्रमवारीत भारत 10 व्या तर पाकिस्तान 19 व्या स्थानावर कायम आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 17,06,226 (+19,790), मृत 99,805 (+505)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 376,669 (+13,051), मृत 23,522 (+806)
  3. रशिया – कोरोनाबाधित 353,427 (+8,946), मृत 3,633 (+92)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 282,480 (+NA), मृत 26,837 (+NA)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 261,184 (+1,625), मृत 36,914 (+121)
  6. इटली – कोरोनाबाधित 230,158 (+300), मृत 32,877 (+92)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 182,942 (+358), मृत 28,432 (+65)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 180,789 (+461), मृत 8,428 (+57)
  9. टर्की – कोरोनाबाधित 157,814 (+987), मृत 4,369 (+29)
  10. भारत – कोरोनाबाधित 144,950 (+6,414) , मृत 4,172 (+148)
  11. इराण – कोरोनाबाधित 137,724 (+2,023), मृत 7,451 (+34)
  12. पेरू –  कोरोनाबाधित 123,979 (+4,020) , मृत 3,629 (+173)
  13. कॅनडा –  कोरोनाबाधित 85,711 (+1,012), मृत 6,545 (+121)
  14. चीन – कोरोनाबाधित 82,985 (+11), मृत 4,634 (NA)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 74,795 (+2,235) मृत 399 (+9)
  16. चिली – कोरोनाबाधित 73,997 (+4,895), मृत 761 (+43)
  17. मेक्सिको – कोरोनाबाधित 68,620 (+2,764), मृत 7,394 (+215)
  18. बेल्जियम – कोरोनाबाधित 57,342 (+250), मृत 9,312 (+32)
  19. पाकिस्तान – कोरोनाबाधित 56,349 (+1,748), मृत 1,167 (+34)
  20. कतार – कोरोनाबाधित 45,465 (+1,751), मृत 26 (+3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.