Corona World Update: जगातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 74 लाखांच्या पुढे

जगातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 72.77 टक्के, मृत्यूदर 3.12 टक्के तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 24.11 टक्क्यांपर्यंत खाली

MPC News (Vivek Inamdar) –  जगातील सक्रिय रुग्णांची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत असली तरी सक्रिय रुग्णसंख्या मात्र वाढत आहे. जगातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 74 लाखांच्या वर गेली आहे. कोरोना विषाणूचा आतापर्यंत जगातील 3 कोटी 6 लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून त्यापैकी 2 कोटी 23 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण 72.77 टक्क्यांपेक्षा अधिक आहे, तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 24.11 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.  

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 06 लाख 94 हजार 541 झाली असून आतापर्यंत एकूण 9 लाख 56 हजार 438 (3.12 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 23 लाख 36 हजार 284 (72.77 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 74 लाख 01 हजार 819 (24.11 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 73 लाख 40 हजार 410 (99.17 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 61 हजार 409 (0.83 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

मागील पाच दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

14 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 42 हजार 856, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 48 हजार 690, मृत्यू 4 हजार 379

15 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 2 लाख 78 हजार 856 , नवीन कोरोनामुक्त 2 लाख 61 हजार 765, मृत्यू 6 हजार 005

16 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 08 हजार 226, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 62 हजार 620, मृत्यू 6 हजार 229

17 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 09 हजार 054, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 31 हजार 924 , मृत्यू 5 हजार 484

18 सप्टेंबर – नवीन कोरोनाबाधित 3 लाख 15 हजार 130, नवीन कोरोनामुक्त 2 लाख 98 हजार 506 , मृत्यू 5 हजार 465

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

 

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.