Corona World Update: जगातील कोरोनामुक्तांचा टक्का वाढतोय, 68 टक्के रुग्णांची कोरोनावर मात!

एकूण 2.33 कोटींपैकी 1.59 कोटी रुग्ण बरे, सक्रिय रुग्ण संख्या 66.64 लाख तर मृतांचा आकडा आठ लाखांवर!

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा आतापर्यंत जगातील दोन कोटी 33 लाखांपेक्षा अधिक संसर्ग झाला असून त्यापैकी 1 कोटी 59 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण 68.03 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 3.46 टक्क्यांपर्यंत तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 28.51 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. काल (शनिवारी) दिवसभरात सुमारे 2 लाख 67 हजार  नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी सुमारे 2 लाख 13 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 2 कोटी 33 लाख 79 हजार 006 झाली असून आतापर्यंत एकूण 8 लाख 08 हजार 681 (3.46 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 कोटी 59 लाख 06 हजार 037 (68.03 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 66 लाख 64 हजार 288 (28.51 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 66 लाख 02 हजार 582 (99.07 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 61 हजार 706 (0.93 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. 

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

16 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 12 हजार 629, कोरोनामुक्त 2 लाख 27 हजार 243, मृतांची संख्या 4 हजार 533

17 ऑगस्ट – नवे रुग्ण 1 लाख 91 हजार 521, कोरोनामुक्त 2 लाख 24 हजार 762, मृतांची संख्या 4 हजार 083

18 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 53 हजार 842, कोरोनामुक्त 2 लाख 55 हजार 725, मृतांची संख्या 6 हजार 312

19 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 71 हजार 795, कोरोनामुक्त 2 लाख 54 हजार 798 , मृतांची संख्या 6 हजार 676

20 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 67 हजार 110, कोरोनामुक्त 2 लाख 13 हजार 313 , मृतांची संख्या 6 हजार 183

21 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 58 हजार 278, कोरोनामुक्त 1 लाख 92 हजार 040, मृतांची संख्या 6 हजार 062

22 ऑगस्ट – नवे रुग्ण 2 लाख 61 हजार 622, कोरोनामुक्त 1 लाख 99 हजार 744 , मृतांची संख्या 5 हजार 343

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.