Corona World Update: बापरे! कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक कोटींच्या उंबरठ्यावर, एका दिवसात सर्वाधिक 1.94 लाख नवे रुग्ण!

Corona World Update: The total number of corona infection is on the threshold of one crore, the highest number of 1.94 lakh new patients in a single day! कोरोनामुक्तांचे प्रमाण 54 टक्के, मृतांचे प्रमाण 5 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 40.88 टक्के

एमपीसी न्यूज – जगात काल (शुक्रवारी) सर्वाधिक म्हणजे 1 लाख 93 हजार 974 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यामुळे जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा एक कोटींच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 54 टक्क्यांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 5 टक्के कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. जगातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 41 टक्क्यांहून खाली आहे, ही बाब त्यातल्या त्यात दिलासा देणारी आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 99 लाख 03 हजार 777 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 4 लाख 96 हजार 796 (5.02 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 53 लाख 57 हजार 154 (54.10 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 40 लाख 49 हजार 827 (40.88 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 39 लाख 92 हजार 184  (98.58 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 57 हजार 643 (1.42 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. 

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

20 जून – नवे रुग्ण 1 लाख 56 हजार 923, कोरोनामुक्त 1 लाख 12 हजार 990 , मृतांची संख्या 4 हजार 428

21 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 254, कोरोनामुक्त 1 लाख 685 , मृतांची संख्या 3 हजार 338

22 जून – नवे रुग्ण 1 लाख 38 हजार 975, कोरोनामुक्त 82 हजार 775 , मृतांची संख्या 3 हजार 880

23 जून – नवे रुग्ण 1 लाख 62 हजार 994, कोरोनामुक्त 1 लाख 19 हजार 809 , मृतांची संख्या 5 हजार 465

24 जून – नवे रुग्ण 1 लाख 72 हजार 383, कोरोनामुक्त 1 लाख 32 हजार 611, मृतांची संख्या 5 हजार 071

25 जून – नवे रुग्ण 1 लाख 79 हजार 718, कोरोनामुक्त 85 हजार 189, मृतांची संख्या 5 हजार 179

26 जून – नवे रुग्ण 1 लाख 93 हजार 974, कोरोनामुक्त 98 हजार 484, मृतांची संख्या 4 हजार 891

अमेरिकेत सक्रिय कोरोना रुग्ण संख्या 13.5 लाखांच्या पुढे

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्येत काल (शुक्रवारी) 47 हजार 341 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या 25 लाख 52 हजार 956 झाली आहे. शुक्रवारी 663 कोरोनाबाधित मृतांची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 1 लाख 27 हजर 640 वर जाऊन पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 10 लाख 68 हजार 703 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अजून 13 लाख 56 हजार 613 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 1,055 कोरोनाबाधितांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 1,055 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे ब्राझीलमधील कोरोना बळींचा एकूण आकडा 56 हजार 109 वर जाऊन पोहचला आहे. ब्राझीलमध्ये एकूण 12 लाख 80 हजार 054 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 6 लाख 97 हजार 526 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ब्राझीलमधील सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 26 हजार 419 आहे.

मेक्सिको दोन लाख कोरोनाबाधित तर 25 हजार बळी

अमेरिका व ब्राझीलच्या पाठोपाठ मेक्सिकोतील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. शुक्रवारी मेक्सिकोत 736 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेले काही दिवस मेक्सिकोत एका दिवसात अमेरिकेपेक्षाही जास्त कोरोना बळी जात आहेत. मेक्सिकोतील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 02 हजार 951 झाली असून आतापर्यंत 25 हजार 060 कोरोना बळी गेले आहे. मेक्सिकोतील कोरोना मृत्यूदर 12.35 टक्के आहे. जागतिक स्तरावर ही सरासरी 5.02 इतकी आहे.

भारतात गुरुवारी 381 कोरोनाबाधितांचा मृत्यू

भारतात गुरुवारी 381 कोरोना बळींची नोंद झाली आहे. इंग्लंडमध्ये 184, पेरूमध्ये 178, रशियात 176, चिलीमध्ये 165, कोलंबियात 157, इराकमध्ये 122, इराणमध्ये 109 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. इजिप्तमध्ये 87, इक्वाडोर व इंडोनेशियात प्रत्येकी 63 तर पाकिस्तानमध्ये 59 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत पाकिस्तान 12 व्या स्थानावर

जर्मनी आणि टर्कीला मागे टाकत पाकिस्तानने सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत 12 वे स्थान मिळविले आहे. कोरोना रुग्णांची वाढ मंदावल्याने जर्मनी 12 व्या स्थानावरून 14 व्या स्थानावर गेला आहे.  पाकिस्तानमध्ये 1 लाख 95 हजार 745 कोरोनाबाधित रुग्ण असून 3 हजार 962 कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची नोंद आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 25,52,956 (+47,341), मृत 1,27,640 (+663)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 12,80,054 (+46,907), मृत 56,109 (+1,055)
  3. रशिया – कोरोनाबाधित 6,20,794 (+6,800), मृत 8,781 (+176)
  4. भारत – कोरोनाबाधित 5,09,446 (+18,276) , मृत 15,689 (+381)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 309,360 (+1,380), मृत 43,414 (+184)
  6. स्पेन – कोरोनाबाधित 2,94,985 (+419), मृत 28,338 (+8)
  7. पेरू –  कोरोनाबाधित 2,72,364 (+3,762) , मृत 8,939 (+178)
  8. चिली – कोरोनाबाधित 2,63,360 (+4,296), मृत 5,068 (+165)
  9. इटली – कोरोनाबाधित 2,39,961 (+255), मृत 34,708 (+30)
  10. इराण – कोरोनाबाधित 2,17,724 (+2,628), मृत 10,239 (+109)
  11. मेक्सिको – कोरोनाबाधित 2,02,951 (+6,104), मृत 25,060 (+736)
  12. पाकिस्तान – कोरोनाबाधित 1,95,745 (+2,775), मृत 3,962 (+59)
  13. टर्की – कोरोनाबाधित 1,94,511 (+1,396), मृत 5,065 (+19)
  14. जर्मनी – कोरोनाबाधित 1,94,399 (+614), मृत 9,026 (+14)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 1,74,577 (+3,938) मृत 1,474 (+46)
  16. फ्रान्स – कोरोनाबाधित 1,62,936 (+1,588), मृत 29,778 (+26)
  17. बांगलादेशकोरोनाबाधित 1,30,474 (+3,868), मृत 1,661 (+40)
  18. दक्षिण अफ्रिका – कोरोनाबाधित 1,24,590 (+6,215), मृत 2,340 (+48)
  19. कॅनडा –  कोरोनाबाधित 1,02,794 (+172), मृत 8,508 (+4)
  20. कतार – कोरोनाबाधित 92,784 (+946), मृत 109 (+3)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.