Corona World Update: चिंताजनक! सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत आता भारत सहाव्या स्थानावर

Corona World Update: Worrying! India now ranks sixth in the world rankings of the most corona effected countries

एमपीसी न्यूज – जगात काल (शुक्रवारी) आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 1 लाख 30 हजार 529 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर 89 हजार 947 रुग्ण काल दिवसभरात कोरोनामुक्त झाले. जगातील कोरोनामुक्तांची टक्केवारी 48.93 टक्क्यांपर्यंत वाढली असून सक्रिय रुग्णांची टक्केवारी 45.25 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत इटलीला मागे टाकत भारत सहाव्या स्थानावर पोहचला आहे. भारताचा शेजारी पाकिस्तान पाठोपाठ आता बांगलादेशने TOP-20 मध्ये प्रवेश केला आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 68 लाख 44 हजार 705 इतकी झाली असून आतापर्यंत एकूण 3 लाख 98 हजार 141 (5.82 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 33 लाख 48 हजार 831 (48.93 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात आता कोरोनाचे 30 लाख 97 हजार 733 (45.25 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 30 लाख 44 हजार 120 (98 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 53 हजार 613 (2 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सात दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

30 मे – नवे रुग्ण 1 लाख 24 हजार 102, मृतांची संख्या 4 हजार 084

31 मे – नवे रुग्ण 1 लाख 08 हजार 767,  मृतांची संख्या 3 हजार 191

1 जून – नवे रुग्ण 1 लाख 03 हजार 050, मृतांची संख्या 3 हजार 017

2 जून – नवे रुग्ण 1 लाख 15 हजार 215, कोरोनामुक्त 1 लाख 07 हजार 201, मृतांची संख्या 4 हजार 669 

3 जून – नवे रुग्ण 1 लाख 21 हजार 413,  कोरोनामुक्त 1 लाख 53 हजार 699, मृतांची संख्या 4 हजार 929

4 जून – नवे रुग्ण 1 लाख 29 हजार 990,  कोरोनामुक्त 80 हजार 831, मृतांची संख्या 5 हजार 499

4 जून – नवे रुग्ण 1 लाख 30 हजार 529,  कोरोनामुक्त 89 हजार 947, मृतांची संख्या 4 हजार 906

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 36 हजारांच्या पुढे

इटलीला मागे टाकत भारताने सर्वाधिक कोरोनाबाधित देशांच्या क्रमवारीत सहावे स्थान मिळविले आहे. सुरुवातील 41 व्या स्थानावर असलेला भारत प्रथम Top-20 मध्ये नंतर Top-10 मध्ये गेला. गेले काही दिवस भारत सातव्या स्थानावर होता. आता भारताने सहावे स्थान मिळविले आहे. भारताच्या पुढे आता अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन व इंग्लंड हे पाच देश आहेत.

भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 36 हजार 184 झाली आहे. काल (शुक्रवारी)  9 हजार 471 नव्या रुग्णांची भर पडली. गेल्या काही दिवसांत दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढत चालली आहे.

भारतात मृत्यूदर 2.82 टक्के, जागतिक दरापेक्षा निम्म्याहून कमी

भारतात काल (शुक्रवारी) 286 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित बळींचा आकडा 6,649 पर्यंत पोहचला आहे. कोरोनाबाधितांचा एकूण आकडा वाढला असला तरी भारताने मृत्यूदर 2.82 टक्के इतका मर्यादित ठेवण्यात यश मिळविले आहे. जागतिक मृत्यूदर 5.82 टक्के आहे. म्हणजेच भारतातील मृत्यूदर जागतिक मृत्यूदराच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. 

कोरोनामुक्तांचे प्रमाण 48 टक्के

आतापर्यंत 1 लाख 13 हजार 233 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण 47.94 टक्के झाले आहे. भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या घटून  1 लाख 16 हजार 302 झाली आहे. हे प्रमाण 49.24 टक्के झाले आहे. कोरोनामुक्तांते प्रमाण वाढणे आणि सक्रिय रुग्णांचे प्रमाण घटणे या दोन्ही गोष्टी भारताच्या दृष्टीने आशादायक आहेत.

अमेरिकेतील मृतांचा आकडा 1 लाख 11 हजारांच्या पुढे

अमेरिकेत काल (शुक्रवारी) 975 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 11 हजार 390 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 19 लाख 65 हजार 708 झाली आहे तर 7 लाख 38 हजार 646 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

ब्राझीलमध्ये एका दिवसात 1,008 कोरोना बळी 

ब्राझीलमध्ये शुक्रवारी 1,008 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. बाझीलमधील कोरोना मृतांची संख्या आता 35 हजार 047 झाली आहे. ब्राझीलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 6 लाख 46 हजार 006 झाली आहे तर 2 लाख 88 हजार 652 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. ब्राझिलमधील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या मृतांच्या आकड्यांमुळे भीती अधिकच वाढली आहे.

मेक्सिकोत एका दिवसात 816 कोरोनाबाधितांचा मृत्यू

मेक्सिकोत शुक्रवारी एका दिवसात 816 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मेक्सिकोत कोरोनाबाधित मृतांची संख्या आता 12 हजार 545 झाली आहे.  मेक्सिकोत 1 लाख 5 हजार 680 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 75हजार 448 कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असले तरी गेल्या काही दिवसांत मृतांच्या आकड्यात लक्षणीय वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

बांगलादेश TOP-20 मध्ये

सर्वात आधी कोरोनाची लागण झालेल्या व कोरोना रुग्ण संख्येत सुरूवातीला सर्वप्रथम असलेल्या चीनला मागे टाकत पाकिस्तान आता 17 व्या क्रमांकावर पोहचला आहे. पाकिस्तान पाठोपाठ आता बांगलादेशनेही TOP -20 मध्ये प्रवेश केला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 89,249  इतकी असून मृतांची संख्या 1,838 इतकी आहे. आतापर्यंत 31,198 जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बांगलादेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 60,391 इतकी असून मृतांची संख्या 811 इतकी आहे. आतापर्यंत 12,804 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे., 

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 19,65,708 (+25,393), मृत 1,11,390 (+975)
  2. ब्राझील – कोरोनाबाधित 6,46,006 (+30,136), मृत 35,047 (+1,008)
  3. रशिया – कोरोनाबाधित 4,49,834 (+8,726), मृत 5,528 (+144)
  4. स्पेन – कोरोनाबाधित 288,058 (+318), मृत 27,134 (+1)
  5. यू. के. – कोरोनाबाधित 283,311 (+1,650), मृत 40,261 (+357)
  6. भारत – कोरोनाबाधित 236,184 (+9,471) , मृत 6,649 (+286)
  7. इटली – कोरोनाबाधित 234,531 (+518), मृत 33,774 (+85)
  8. पेरू –  कोरोनाबाधित 187,400 (+4,202) , मृत 5,162 (+131)
  9. जर्मनी – कोरोनाबाधित 185,414 (+491), मृत 8,763 (+27)
  10. टर्की – कोरोनाबाधित 168,340 (+930), मृत 4,648 (+18)
  11. इराण – कोरोनाबाधित 167,156 (+2,886), मृत 8,134 (+63)
  12. फ्रान्स – कोरोनाबाधित 153,055 (+611), मृत 29,111 (+46)
  13. चिली – कोरोनाबाधित 122,499 (+4,207), मृत 1,448 (+92)
  14. मेक्सिको – कोरोनाबाधित 105,680 (+4,442), मृत 12,545 (+816)
  15. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 95,748 (+2,591) मृत 642 (+31)
  16. कॅनडा –  कोरोनाबाधित 94,335 (+609), मृत 7,703 (+66)
  17. पाकिस्तान – कोरोनाबाधित 89,249 (+3,985), मृत 1,838 (+82)
  18. चीन – कोरोनाबाधित 83,027 (+5), मृत 4,634 (0)
  19. कतार – कोरोनाबाधित 65,495 (+1,754), मृत 49 (4)
  20. बांगलादेशकोरोनाबाधित 60,391 (+2,828), मृत 811 (30)
  21. बेल्जियम – कोरोनाबाधित 58,767 (+82), मृत 9,548 (+26)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.