Corona World Update: चिंतावर्धक! सलग दुसऱ्या दिवशी 11 हजारांहून अधिक बळी

जगातील चार कोटींहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात, मृत्यूदर 2.38 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 28.36 टक्क्यांवर!

एमपीसी न्यूज – जगात कोरोना संसर्गाची दुसरी लाट दिवसेंदिवस अधिकच विध्वंसक बनत असून सलग दुसऱ्या दिवशी 11 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे.  काल 11 हजार 89 कोरोना बळींची नोंद झाली. आतापर्यंतचा एका दिवसातील हा सर्वाधिक आकडा आहे. जगभरात काल (शुक्रवारी) साडेसहा लाखांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे जगातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या पावणेसहा कोटींच्या पुढे गेली आहे. त्यापैकी चार कोटींपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजून 1 कोटी 64 लाखांहून अधिक सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत, मात्र गंभीर अथवा चिंताजनक रुग्णांचे प्रमाण 0.62 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. 

जगातील कोरोनाचा मृत्यूदर सातत्याने थोडा-थोडा कमी होत 2.38 टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी नवीन कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण मात्र आता थोडे घसरताना तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढताना दिसत आहे. सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढून 28.36 टक्के झाले आहे.

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 5 कोटी 79 लाख 02 हजार 841 झाली असून आतापर्यंत एकूण 13 लाख 77 हजार 542 (2.38 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 01 लाख 03 हजार 713 (69.26 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 1 कोटी 64 लाख 21 हजार 586 (28.36 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1 कोटी 63 लाख 19 हजार 379 (99.38 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 1 लाख 02 हजार 207 (0.62 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

मागील दोन दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

19 नोव्हेंबर – नवे रुग्ण 6 लाख 57 हजार 130, नवे कोरोनामुक्त रुग्ण 3 लाख 81 हजार 666, मृत्यू 11 हजार 022

20 नोव्हेंबर – नवे रुग्ण 6 लाख 59 हजार 863,  नवे कोरोनामुक्त रुग्ण 3 लाख 71 हजार 017,  मृत्यू 11 हजार 089

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.