Corona World Update: चिंताजनक नवा उच्चांक! 24 तासांत सव्वासहा लाख नवे रुग्ण तर नऊ हजार 82 बळी!

कोरोनामुक्तांचे प्रमाण 70.99 टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण 26.49 टक्के, मृत्यूदर 2.51 टक्के

एमपीसी न्यूज –  जगभरात काल (शुक्रवारी) सुमारे सव्वासहा लाख नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. आतापर्यंतचा एक दिवसातील नव्या कोरोना रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. 24 तासांतील मृतांचा आकडा नऊ हजारांच्या पुढे गेला आहे. शुक्रवारी 9,082 एवढ्या विक्रमी बळींची नोंद झाली. मृतांचा आकडा वाढला असला तरी मृत्यूदरातील घट कायम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण आणखी कमी झाले असून सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे, मात्र गंभीर अथवा चिंताजनक रुग्णांचे प्रमाण 0.69 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. 

जगातील कोरोनाचा मृत्यूदर सातत्याने थोडा-थोडा कमी होत 2.51 टक्क्यांपर्यंत खाली आला असला तरी नवीन कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण मात्र आता थोडे घसरताना तर सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण थोडे वाढताना दिसत आहे. सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढून 26.49 टक्के झाले आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

वाचा एमपीसी न्यूज – अंतरंगचा दसरा विशेषांक

जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 4 कोटी 96 लाख 55 हजार 454 झाली असून आतापर्यंत एकूण 12 लाख 48 हजार 566 (2.51 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 52 लाख 51 हजार 727 (70.99 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 1 कोटी 31 लाख 55 हजार 161 (26.49 टक्के) इतके सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 1 कोटी 30 लाख 64 हजार 353 (99.31 टक्के) रुग्णांचा आजार सौम्य स्वरूपाचा असून 90 हजार 808 (0.69 टक्के) रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.  

_MPC_DIR_MPU_II
Source – https://www.worldometers.info/coronavirus/

मागील तीन दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

4 नोव्हेंबर – नवे रुग्ण 5 लाख 69 हजार 546, नवे कोरोनामुक्त रुग्ण 3 लाख 20 हजार 758, मृत्यू 9 हजार 056

5 नोव्हेंबर – नवे रुग्ण 6 लाख 04 हजार 689,  नवे कोरोनामुक्त रुग्ण 3 लाख 08 हजार 177,  मृत्यू 8 हजार 717

6 नोव्हेंबर – नवे रुग्ण 6 लाख 23 हजार 266,  नवे कोरोनामुक्त रुग्ण 2 लाख 69 हजार 574,  मृत्यू 9 हजार 082

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या, मृतांची संख्या व कोरोनामुक्तांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

Source – https://www.worldometers.info/coronavirus/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.