Pimpri news: कोरोना मृतदेहावर आता विद्युतदाहिनी सोबत लाकडाच्या सरणावर देखील अंत्यसंस्कार

महापालिका आयुक्तांचा निर्णय

एमपीसी न्यूज –  महापालिका हद्दीमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या वाढत आहे.यामुळे विद्युत दाहिनींवर कमालीचा ताण वाढला आहे. अंत्यसंस्कारासाठी नातलगांना ‘वेटींग’ करावे लागत आहे. त्यामुळे पालिकेने विद्युतदाहिनी बरोबर लाकडाच्या सरणावर देखील कोरोना बाधितांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.  तसेच मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी नेमण्यात आलेल्या 4 रॅपिंग  टीम’ मधील कामगारांची संख्या 16 नेवाढवली आहे. 

याबाबतची माहिती महापालिका प्रवक्ते शिरीष पोरेडी यांनी दिली. सद्यस्थितीत निगडी, सांगवी, भोसरी, नेहरुनगर आणि लिंक रोड शेथील शवदाहिनी – विद्युतदाहिनींमध्ये मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. मात्र, गेल्या काही दिवसात मृतांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या विद्युतदाहिनींवर ताण वाढला आहे.  यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी लाकडाच्या सरणावर देखील अत्यंविधी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मृतदेहांचे अंत्यसंस्कार वेळेत होण्यासाठी आणि विलंब टाळण्याकरिता प्रत्येक स्मशानभूमीत वैद्यकीय विभागामार्फत समन्वयक नेमण्यात आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी समन्वयकावर आहे. अंत्यसंस्कारास विलंब होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत. जंबो हॉस्पिटल येथे आणि 5 स्मशानभूमींमध्ये प्रत्येकी 4 असे 20 कामगार वाढविण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला असल्याचे शिरीष पोरेडी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.