Pimpri : ‘कोरोना’चे सावट औषध उद्योग क्षेत्रावरही

एमपीसी न्यूज – चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या ‘कोरोना’ व्हायरसने जगभरात भीतीचे थैमान घातले आहे. भारतात देखील ‘कोरोना व्हायरस’ हळूहळू पसरत असून महाराष्ट्रात देखील शिरकाव करु लागला आहे. ‘कोरोना’चे विविध क्षेत्रावर परिणाम झाला असून औषध उद्योग क्षेत्रावरही त्याचे सावट आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी महापालिका प्रशासनाने ‘अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन आयडी 1 मिली’ हे इंजेक्शन थेट पद्धतीने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

_MPC_DIR_MPU_II

चीनमधील ‘कोरोना’ विषाणूची भीती संपूर्ण जगभर पसरली आहे. त्याचे सावट हिंदूस्थानी औषध उद्योग क्षेत्रावरही पडले आहे. परिणामी, चीनमधून होणारी औषधी घटकांची आयात थांबली आहे. त्यामुळे औषध दरवाढीची भीती व्यक्त केली जात आहे.

म्हणून येत्या किमान तीन ते चार महिन्यांसाठी आवश्यक लागणारा औषधसाठा करून ठेवणे रुग्णहिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. त्यासाठी ‘अ‍ॅन्टी रेबीज व्हॅक्सिन आयडी 1 मिली’ हे इंजेक्शन थेट पद्धतीने खरेदी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.