Lonavala : नांगरगाव येथील कंपनीत कोरोनाचा शिरकाव ; नगरपरिषद प्रशासनाचे दुलर्क्ष

Corona's involvement in the company at Nangargaon; Municipal administration neglect ; कंपनी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसीन्यूज : नांगरगाव औद्यागिक वसाहतीमधील प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण सापडत असताना कंपनी व्यवस्थापन व लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून याकडे दुलर्क्ष होत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नांगरगाव औद्यागिक वसाहतीमधील प्रिव्ही लाईफ सायन्सेस कंपनीमध्ये एका कामगाराला 7 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली. सुपरवायझर असलेली व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कातील इतरांची तपासणी केली असता त्यांचे अहवालही पाॅझिटिव्ह आले.

मात्र, याबाबत कंपनी प्रशासनाने लोणावळा नगरपरिषद अथवा तालुका आरोग्य यंत्रणेला माहिती न कळवता सर्व प्रकार झाकून ठेवला.

आज देखील या कंपनीमधील दोन जणांना कोरोनाची लागण झाली. वास्तविक पाहता कंपनीत कोरोनाचा शिरकाव झालेला असताना तात्काळ ही कंपनी बंद करत ती निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असताना कंपनी व्यवस्थापन मात्र हलगर्जीपणा करत होते.

एखादा रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानंतर तो वास्तव्यास असलेला भाग कंटेन्मेंट झोन करणारे लोणावळा नगरपरिषद प्रशासन नांगरगाव मधील या कंपनी बाबत मात्र बोटचेपी भुमिका घेताना दिसले.

कंपनीच्या आवारात किरकोळ फवारणी करण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई न केल्याने या विभागाचे नगरसेवक सुनिल इंगूळकर व सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

लोणावळा शहरातील नागरिक प्रशासनाला सहकार्य करत आहे, त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, नाही तर उद्रेक होईल, असा इशारा देखील दिला आहे.

प्रिव्ही कंपनी प्रमाणे इतरही काही कंपन्यांमध्ये सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता केवळ कर्मचार्‍यांची पिळवणूक केली जात आहे.

कोरोना महामारी लोणावळ्यात पसरत असताना ती रोखण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्यात लोणावळा नगरपरिषद प्रशासन आता कमी पडू लागले आहे.

मागील तीन महिने कोरोनामुक्त राहिलेल्या लोणावळा शहरात कोरोनाचे 18 रुग्ण झाले आहेत.

खंडाळा येथे चेकपोस्टवर पाचशे रुपये घेऊन वाहनांना शहरात प्रवेश दिला जात असल्याच्या तक्रारी देखील येऊ लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.