India Corona Update : या वर्षातील कोरोनाचा नवा उच्चांक, 24 तासांत वाढले 62,258 नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात या वर्षातील उच्चांकी वाढ झाली असून, 62 हजार 258 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. पाच महिन्यांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ झाली आहे.  

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने पीटीआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 19 लाख 08 हजार 910 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 12 लाख 95 हजार 023 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 30 हजार 386 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.08 टक्के एवढं झाले आहे.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 23 कोटी 97 लाख 69 हजार 553 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 11 लाख 64 हजार 915 चाचण्या शुक्रवारी (दि. 26) करण्यात आल्या आहेत.

देशात सध्या 4 लाख 52 हजार 647 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 291 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 61 हजार 240 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा आहे‌. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 5 कोटी 55 लाख 04 हजार 440 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.