Pimpri-Chinchwad: लॉकडाऊनचे नियम पायदळी, 157 जणांवर कारवाई

coronavirus update Police taken action against 157 people for breaking lockdown rules in pimpri chinchwad

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनमध्ये प्रशासनाने काढलेल्या नियमावलीला नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जात असल्याचे दररोज होणाऱ्या कारवाईच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. प्रशानाच्या नियमांना पायदळी तुडवणाऱ्या आणखी 157 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यात प्रशासनाने लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्याचबरोबर सायंकाळी सात ते सकाळी सात या कालावधीत संचारबंदीही लागू राहणार आहे.

नागरिकांनी गर्दी करू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच तोंडाला मास्क घालावा असे काही सुरक्षेचे नियम घालून दिले आहेत. नागरिकांकडून दिवसेंदिवस नियम मोडले जात आहेत. अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई देखील केली जात आहे.

सोमवारी (दि.25) पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (10), भोसरी (2), पिंपरी (21), चिंचवड (13), निगडी (8), आळंदी (6), चाकण (1), दिघी (20), म्हाळुंगे चौकी (5), सांगवी (11), हिंजवडी (12), देहूरोड (8), तळेगाव दाभाडे (3), तळेगाव एमआयडीसी (7), चिखली (21), रावेत चौकी (8), शिरगाव चौकी (1), वाकड (0) अशा एकूण 157 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.