शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Pune : वसंत मोरे यांची योगेश टिळेकर यांच्या विरुद्ध एसीबीकडे तक्रार

एमपीसी न्यूज – हडपसर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवण्यात आली आहे.

पुणे महापालिकेतील मनसेचे गट नेते वसंत मोरे यांनी ही तक्रार दिली आहे. बांधकाम व्यावसायिकाचा फायदा करुन देण्यासाठी आमदार टिळेकर यांनी एक कोटी 4 लाख रुपये किमतीची मर्सडिज फॉरमॅटीक गाडी लाच स्वरुपात स्वीकारल्याचा आरोप केला आहे.

स.नं.३६,३७, व ३८ यांचे आरक्षण बदलण्याकामी हडपसर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार योगेश पुंडलिक टिळेकर यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा गैरवापर करत. सदर जागा मालकांकडून कोट्यावधी रूपयांची रक्कम घेतली आहे. त्यापैकी सुमारे १ कोटी ४ लाख रूपयाची मर्सडिज फॉरमॅटीक गाडी वस्तू स्वरूपात स्वीकारलेली आहे. सदर गाडी खरेदीसाठी उत्पन्नाचा स्त्रोत लपविण्यासाठी तसेच आयकर विभाग व अन्य कर स्वरूपातील विभागांची दिशाभूल व फसवणूक करण्यासाठी सदर गाडी थेट आपल्या नावावर न घेता येवलेवाडी परिसरातील बांधकाम व्यावसायिक संजीव श्रद्धानंद त्यागी यांचे नावे घेतली आहे. असा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.

परंतु सदर गाडी ही घेतल्यापासून स्वतः आमदार वापरत आहेत. सदर गाडी भेट देणारी व्यक्ती यांच्या जागेवरील हिलटॉप हिलस्लोपचे व रस्त्याचे आरक्षण बदलून ते रहिवाशी करण्यात आले आहे. त्या बदल्यात त्या बांधकाम व्यावसायिकाचा ५० कोटी रूपये पेक्षा अधिकच फायदा त्यांना करून दिला आहे. त्या बदल्यात लाच स्वरूपात सदर गाडी कोटयावधीची रक्कम आमदार योगेश टिळेकर यांनी आपल्या महाराष्ट्र लोकप्रतिनिधी कायदान्वये मिळालेल्या विधानसभा सदस्यत्वाच्या अधिकाराचा गैरवापर करून मिळविलेली, अस देखील वसंत मोरे यांनी तक्रारीत म्हणाले आहेत.

spot_img
Latest news
Related news