BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : प्लास्टिक पिशव्या वापरणा-या व्यावसायिकांकडून 10 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वार्ड क्र 21 व ब क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत वार्ड क्र. 19 यांच्या पिंपरी शगून चौक ते साई चौक येथे संयुक्त कारवाईमध्ये दोन दुकानदरांकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. 

कारवाईत 20 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन दुकानदारांकडे 4 किलो प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. त्यांना महानगरपालिकेच्या शासकीय नियमानुसार प्रत्येकी 5000/- रु असे एकूण 10,000/- रु दंड करण्यात आला आहे.  ही कारवाई आरोग्य निरीक्षक एस.बी.चन्नाल व वाय.बी.फल्ले व कर्मचारी अरुण राऊत, विकास शिंदे, दाजी करवंदे, सोन्या भाट, आनंद भालके, सागर सांगळे, सागर विटकर, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.