_MPC_DIR_MPU_III

Pimpri News: पालिकेचे 47 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त

Corporations 47 officers, employees retired.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्वाभिमान व निष्ठा बाळगणारे अधिकारी-कर्मचारी आज सेवानिवृत्त होत असून त्यांच्या अनुभवाचा लाभ इथून पुढेही महानगरपालिकेला मिळत राहावा असे मत उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त केले.

_MPC_DIR_MPU_IV

मनपा सेवेतून माहे मार्च 2020 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या आणि माहे नोव्हेंबर 2020 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या एकूण 47 अधिकारी व कर्मचा-यांचा अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुस्तक, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

कै. मधुकर पवळे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, किरण कापसे,सुप्रिया सुरगुडे, तुकाराम गायकवाड, अविनाश तिकोने, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

महापालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये कार्यालयीन अधिक्षक सुरेश कोंढरे, नंदकिशोर वाघ, विजय गायकवाड, मुख्याध्यापक दीपक आब्दुले, सुरेखा भोसले, असिस्टंट मेट्रन कमल डांगे, सिस्टर इन्चार्ज मिरा कदम, प्रेमलता जगताप, लेखापाल शंकर भालेराव, उपलेखापाल गिरीश इंदापूरकर, अशोक कदम, नीता वर्पे, स्टाफ नर्स शैलजा जानराव, मिटर निरिक्षक दत्तात्रय चिल्लाळ, नर्स मिड वाईफ स्मिता सोमण, ए.एन.एम. राजश्री बैरागी, उपशिक्षक साधना लोखंडे, विजया पाटील, दत्तात्रय केंगळे, हेमलता वसेकर, सुजाता गुरव, मुकादम रविंद्र जगताप, सुतार उत्तम शेवाळे, प्लंबर अंकुश तांबे, सफाई कामगार अलका बनसोडे, मोहरा मुरगुंड, सत्वशील चव्हाण, रामचंद्र शेळके, कविता ढोरे, सुवर्णा साळवी, रत्नमाला मोरे, लता लोंढे, वैशाली वडागळे, सुमन बनसोडे, बाबा फारुक, पुष्पा कदम, ताराबाई लोंढे, आया बेबी ननवरे, मजूर चंद्रकांत भोईर, रामचंद्र तवर, रखवालदार भगवान शिवरकर, सफाईसेवक शांताराम वाल्मिकी, विमला वाल्मिकी, कचरा कुली नामदेव साबळे, गटरकुली सुनील सोनावणे, मोहन जाधव आदींचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.