PimpleSaudagar : नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शीतल काटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी  न्यूज –   पिंपळे सौदागर येथील पिंपरी चिंचवड मनपाच्या आण्णासाहेब मगर माध्यमिक शाळेतील इयत्ता १० वी मधील शालांत परीक्षा सन २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून पास झालेल्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार  नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल नाना काटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

नगरसेवक विठल उर्फ नाना काटे व नगरसेविका  शितल  नाना काटे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी हभप आत्माराम महाराज शास्त्री हे उपस्थित होते. त्यांच्या वतीने  विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे  वाटप करण्यात आले. नगरसेवक नाना काटे व नगरसेविका शितल  काटे यांच्या वतीने विध्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी आण्णासाहेब मगर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता इसकांडे,  इंगवले सर, हभप विलास काटे, हभप  रघुनाथ आणा काटे, पै. अर्जुन काटे, उत्तम धनवटे,  बाळासाहेब काटे, प्रमोद काटे,  दिलीप काटे,  पोपट जगताप,  चंद्रकांत काटे, शामराव काटे,  संदीप काटे व पालक वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.