Nigdi News: नगरसेवक उत्तम केंदळे यांचा महावितरणला ‘एसएमएस’द्वारे विजेचा शॉक

यमुनानगर मधील हजारो नागरिकांनी एसएमएस करून महावितरण अधिकाऱ्याला विचारला जाब

एमपीसी न्यूज – गेल्या एक वर्षांपासून निगडी, यमुनानगर भागातील वीज पुरवठा दिवसातून दोन तास बंद असतो. याबाबत क्रीडा समिती सभापती प्रा. उत्तम केंदळे यांनी महावितरण अधिकाऱ्याला फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे देत असत.

त्यामुळे केंदळे यांनी कंटाळून नागरिकांना आव्हान केल की “जसे नगरसेवक म्हणून आपण मला विजेच्या प्रश्नाबाबत विचारना करता तसीच विचारणा महावितरण अधिकाऱ्याला आपण एसएमएस द्वारे करा” या आव्हानाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यमुनानगर मधील हजारो नागरिकांनी एसएमएस करून महावितरण अधिकाऱ्याला जाब विचारला. महावितरणला ‘एसएमएस’द्वारे विजेचा शॉक दिला.

कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांना भरमसाठ वीजबिले आलीत. याबाबत ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.भारतीय जनता पार्टीच्या वतीने  वीजबिले  माफ करण्यासाठी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र, कोणाचीच वीजबिले रद्द करण्यात आलेली नाहीत.यमुनानगर भागातील विज गेली एक वर्ष झाले दिवसातून दोन तास बंद असते.या भागातील नागरिक विज बंद राहत असल्यामुळे हैराण झाले आहेत.

नगरसेवक केंदळे यांनी अनेक वेळा पाठपुरावा करूनही पुणे महावितरण विभागाचे मुख्य अधिकारी पंकज तगलपल्लेवार झोपेचे सोंग घेत होते.त्यामुळे  झोपलेल्या  अधिकाऱ्याला जाग करण्यासाठी त्यांनी नागरिकांना एसएमएसद्वारे जाब विचारण्यासाठी आवाहन केले.त्यांच्या आवाहनाला यमुनानगर भागातील जवळपास दोन हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला.

अधिकाऱ्याला एसएमएस गेले असता अधिकाऱ्याने केंदळे यांना फोन करून नागरिकांना नंबर का दिला विचारणा केली.त्यावेळी केंदळे म्हणाले नागरिक मलाही फोन करून ऑनलाईन क्लासेस चालू असताना वीज गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे. अनेक ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे असे प्रश्न विचारत असतात.

काहींच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर काहींचे विजेवर चालणारे छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले आहेत याला जबाबदार कोण?यापुढे विजेच्या बाबतीत कोणतीही दुर्घटना घडली तर त्याला आपण जबाबदार असाल असा इशाराही नगरसेवक प्रा. केंदळे यांनी महावितरण अधिकाऱ्याला दिला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.