Nigdi: सफाई कर्मचा-यांसोबत नगरसेवकांची दिवाळी 

414

एमपीसी न्यूज – प्रभाग स्वच्छ ठेवणा-या सफाई कर्मचा-यांसोबत नगरसेवक उत्तम केंदळे यांनी दिवाळी साजरी केली.  यावेळी सफाई कर्मचा-यांना दिवाळी भेट देण्यात आली. 

HB_POST_INPOST_R_A

यावेळी नगरसेविका कमल घोलप, भाजप नेते बापू घोलप, सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील, गोरख कोलते, उमेश घोडेकर, प्रभु बालचंद्रन, कौस्तुभ देशपांडे, विशाल केंदळे, गणेश साठे यांच्यासह निगडी, प्रभागातील सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचा-यांच्या चेह-यावर मोठा उत्साह होता.

नगरसेवक केंदळे म्हणाले, ‘सफाई कर्मचारी शहराची स्वच्छता राखतात. त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे. जिवन जगत असताना दिवाळी भेट सगळ्यांना देतोच. परंतु, स्वच्छतेचे काम करणा-या कर्मचा-यांचा गौरव करणे ख-या अर्थाने गरजेचे आहे. त्यांच्यामुळेच शहर चकाचक राहते.  सफाई कर्मचारी दररोज नागरिकांच्या घरातील कचरा उचलतात. प्रभाग आणि शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने काम करतात. यामूळे शहर स्वच्छतेचे उदिष्ट पुर्ण होत असते.
साफसफाई कर्मचा-यांचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे’.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: