Pimpri : कचरावेचक कर्मचाऱ्याच्या कामाचे रेटिंग देताना नगरसेवकांवर जबरदस्ती नको

प्रमोद कुटे यांची पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाला  सूचना

एमपीसी न्यूज – प्लंबर किंवा कचरावेचक कर्मचारी चांगले काम करतो का ? कामगार वर्ग कुशल आहे का? त्याचे काम कसे आहे? या सगळ्यांची माहिती आपल्याला नसते.

शहरात काम करणा-या कचरावेचक कर्मचा-यांसाठी कामांचे रेटिंग होऊन एप्लॉयबिलिटी म्हणजेच 1-10 दरम्यान ग्रेड द्यावा लागणार आहे. पण हे देत असताना कोणत्याही नगरसेवकांवर जबरदस्ती करु नये, त्यांना स्वातंत्र्य द्या अशी सूचना  नगरसेवक प्रमोद कुटे यांनी दिली आहे.

शहराच्या स्वच्छतेत खारीचा वाटा उचलणा-या कचरावेचक कर्मचा-यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने कचरा व स्टार रेटिंग डिक्लेरेशन वॉर्ड निहाय गुणवत्ता प्रारुप देण्याचे काम सुरु आहे. प्रशासनाकडून तशी पावले उचलण्यात येत आहेत. त्याची अंमलबजावणी सुरु आहे. पण ही अंमलबजावणी सुरु असताना शहरातील काही नगरसेवकांवर जबरदस्तीने 1 नंबरच रेटिंग द्या असा आग्रह धरण्यात येत आहे. तरी नगरसेवकांवर अशी जबरदस्ती करु नये अशी मागणी प्रमोद कुटे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.