Nashik News : कोराेना’वाढ’ चिंताजनक! गुरूवारी आढळले 558 नवे बाधित

एमपीसी न्यूज : गेल्या आठ-दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात कराेनाबाधित रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. गुरूवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात 558 नवे रूग्ण मिळाले असून यात  पालिका हद्दीतील 349 रूग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीत कराेना रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढतच असून कराेना वाढ सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. 

सध्या जिल्ह्यात 3421 रूग्ण उपचार घेत आहेत. तर गुरूवारी 330 रूग्ण बरे हाेऊन घरी गेले. गुरूवारी जिल्ह्यात पाच जणांचा कराेनाने मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत कोराेनाने 2122 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक मनपा हद्दीत 1044, जिल्हा 843, बाह्य 58 आणि मालेगावला 843जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 24 हजार 307  रूग्ण बाधित आढळले असून त्यापैकी 1 लाख 18 हजार 764 रूग्ण बरे झाले आहेत. तर 2281 अहवाल प्रगतिपथावर असल्याची माहिती नाेडल आधिकारी डाॅ. अनंत पवार यांनी दिली आहे.

मनपा हद्दीत गुरूवारी 349 बाधित आढळले. आत्तापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र 653 झाले आहेत. तर 78 हजार 59 रूग्णांना घरी सोडले आहे. सध्या मनपा हद्दीत 2508 रूग्ण उपचार घेत आहेत. तर काल (दि. 4) मटाले नगर, हौसिंग सो., कामठवाडे येथील 69 वर्षीय वृद्ध महिलेचे कराेनाने निधन झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.