Pimpri: ‘यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईच्या निविदेत 350 कोटींचा भ्रष्टाचार, निविदा रद्द करा – योगेश बाबर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची काढलेल्या 742 कोटी रुपयांच्या निविदेत तब्बल 350 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यातून कंत्राटदार मालामाल होणार असल्याचा आरोप करत निविदा रद्द करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केली आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने सात वर्षांकरिता 740 कोटींची निविदा काढली. त्यामध्ये यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी मशिन कंत्राटदारांनी खरेदी करायचे आहेत. यामध्ये मोठा गडबड घोटाळा आहे.

बाजारमूल्यनुसार वाहनांचे खरेदी मूल्य 70 कोटी रुपये धरले तरी, करदात्यांचे तब्बल 350 कोटी रुपये कंत्राटदारांच्या खिशात घालण्याचे काम कोणाच्या दबावाखाली होत आहे, सल्लागाराला हाताशी धरून अशा प्रकारच्या निविदा प्रसिद्ध करण्यामागे कोणाचे लागेबांधे आहेत, रिंग करून निविदा भरणारे कंत्राटदार कोण आहेत, आपल्या अधिपत्याखाली 350 कोटी रुपयांची उघड लूट होत असताना आपण बघ्याची भूमिका घेणार आहात का, असे विविध प्रश्न बाबर यांनी उपस्थित केले आहेत. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.