Wakad News : अमेरिकेत कॉस्मेटीक सर्जन असून भारतात स्थायिक व्हायचे असल्याची थाप मारुन महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन असून लग्नानंतर भारतात स्थायिक व्हायचे असल्याची थाप मारून एका महिलेची 12 लाख 29 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार 20 ऑक्टोबर 2020 पासून 3 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.

+15095982813 व [email protected] धारक अर्जून गोपाल, +918974305438 धारक शालिनी अय्यर, +13239912067 धारक गोपाल, मेल आयडी धारक [email protected], [email protected], एसबीआय बँक अकाउंट नंबर 34897569971,  एसबीआय बँक अकाउंट नंबर 203573115303,  एसबीआय बँक अकाउंट नंबर 39027431531, सिंडीकेट बँक अकाउंट नंबर 20132610004360, आयडीएफसी बँक अकाउंट नंबर 10040648835, कोटक महिंद्रा बँक अकाउंट नंबर 1013880702 धारक व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी अर्जुन गोपाल याची मेट्रोमोनीयल, डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली. त्यांनतर त्यांनी व्हॉट्सअॅप कॉल, व्हिडीओ कॉल आणि मेलआयडी द्वारे एकमेकांशी संवाद साधला. त्यात आरोपी अर्जुन याने ‘तो अमेरिकेत कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर आहे. त्याला फिर्यादीसोबत लग्न करायचे आहे. भारतात येऊन स्थायिक व्हायचे आहे’ अशी थाप मारली.

त्यानंतर आरोपी अर्जुन याने त्याच्या आईच्या डोक्याला मार लागला असून तिच्यावर उपचारासाठी बेंगलोर येथील शिनॉय फार्म येथील XINOCIN नावाची औषधी बियांचे औषध पाठविण्यासाठी एक लाख 29 हजार 900 रुपये भरण्यास भाग पाडले.

_MPC_DIR_MPU_II

अर्जुनचे वडील गोपाल याने फिर्यादी यांच्या वडिलांसोबत मिळून त्याच औषधी बियांचा भागीदारीमध्ये व्यवसाय कारण्याचे अमिश दाखवून त्यापोटी सहा लाख 49 हजार 500 रुपये भरण्यास भाग पाडले. बनावट औषधी बिया देऊन त्या विकत घेण्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीच्या परचेस मॅनेजरसोबत आपण भारतात येत असल्याचे सांगितले.

भारतात एअरपोर्टवर ग्रीन कार्ड नसल्याने पकडले असून तेथून सोडविण्यासाठी दंड म्हणून दोन लाख 70 हजार, आजारी असल्याचे सांगून 80 हजार घेतले. त्याच्या सोबत भारतात आलेल्या परचेस मॅनेजरने व्यवसायासाठी आणलेले डॉलर कस्टमने पकडले असल्याने ते सोडविण्यासाठी एक लाख रुपये देण्यास सांगितले.

वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपी अर्जुन याने फिर्यादी महिलेकडून 12 लाख 29 हजार 400 रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर भरण्यास सांगितले. ते पैसे त्याने परत दिले नाहीत. तसेच औषधी बियांचा व्यवसाय न करता फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांची फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.