Pune : मालवेअर अटॅकनंतर तब्बल 27 दिवसांनी कॉसमॉस बॅंकेचे ऑनलाईन व्यवहार सुरू

एमपीसी न्यूज – मालवेअर अटॅकनंतर तब्बल 27 दिवसांनी कॉसमॉस बँकेचे ऑनलाईन व्यवहार सुरू झाले आहेत, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे. 

कॉसमॉस बँकेचा पेमेंट सर्व्हर हॅक करून तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये परस्पर काढण्यात आले होते. त्यानंतर कॉसमॉस बॅंकेचे सर्व ऑनलाईन व्यवहार तात्पुरते बंद करण्यात आले होते. ही घटना 11 ऑगस्टला घडली होती. घटनेमुळे संपूर्ण बँकींग विश्वात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, हे व्यवहार आजपासून सुरू करण्यात आले आहेत. इंटरनेट बॅंकींग सुरू करण्यापूर्वी जुन्या पासवर्डच्या मदतीने लॉगईन करून सर्व आयडी आणि पासवर्ड बदलून खातेदारांनी आपले व्यवहार सुरू करावे, अशी सूचना कॉसमॉस बॅंकेने दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.