Pimpri News : कोरोनाबाधितांच्या अंत्यविधीसाठी प्रत्येकी आठ हजारांचा खर्च

स्थायी समितीकडून दोन हजारांची वाढ

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सरणाचा खर्च महापालिका करणार असून त्यात स्थायी समितीने वाढ केली आहे. यापूर्वी आयुक्तांनी प्रति मृतदेह सहा हजार रुपये खर्च निश्चित केला होता. त्यात स्थायी समितीने आणखी दोन हजार रुपयांची वाढ केली आहे.

कोरोना बाधित मृत व्यक्तींच्या पार्थिवावर महापालिकेच्या विद्युत आणि गॅस दाहीनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या मृत्यूसंख्येमुळे निगडी, सांगवी, भोसरी, लिंकरोड चिंचवड आणि नेहरूनगर येथील पारंपारिक स्मशानभूमींमध्ये कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले लाकूड आणि गोव-यांसाठी 6 हजार रुपये खर्चास मान्यता दिली होती. त्यात इतर उपाययोजनांसाठी 2 हजार रुपये अतिरिक्त वाढ करुन अंत्यसंस्कारासाठी प्रती मृतदेह एकूण 8 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.