Pimpri : संविधान दिनाकडे नगरसेवकांनी फिरविली पाठ

एमपीसी न्यूज – देशभरात संविधान दिन मोठा उत्साहात साजरा होत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील संविधान दिनाच्या कार्यक्रमाकडे नगरसेवकांनी मात्र पाठ फिरविली. केवळ बोटावर मोजण्याइतके नगरसेवक संविधान दिनाच्या कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळे नगरसेवकांबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949  रोजी संविधान समितीने स्वीकारला होता.

आज देशभरात संविधान दिन साजरा केला जात आहे. महापालिकेच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आणि  पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी केले. मात्र, या कार्यक्रमाकडे नगरसेवकांनी पाठ फिरविली. केवळ बोटावर मोजण्याइतके नगरसेवक कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, नगरसदस्य नामदेव ढाके, नगरसदस्या शारदा सोनावणे, अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, नगररचना उपसंचालक राम पवार, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, शिक्षणाधिकारी पराग मुंढे, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.