Countdown of SSC Exam: काऊंटडाऊन दहावी! भाग 7 : दहावीच्या भूमितीची करूयात दहा दिवसांत तयारी – मनोज उल्हे

एमपीसी न्यूज – दहावीची परीक्षा अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर एमपीसी न्यूज शिक्षण संवाद आपल्यासाठी ‘काऊंटडाऊन दहावी’ ही ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू केली आहे. यात परीक्षेचं मानसशास्त्र, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, कोणत्या प्रश्नाला किती महत्त्व व वेळ द्यावा, जास्तीत जास्त गुण कसे मिळवाल, या विषयावर अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. 

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद केजी टू पीजी या व्यासपीठाच्या माध्यमातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला जाता-जाता ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहोत. या संवादाचा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होईल, अशी आशा वाटते. या संवादातून अभ्यास करताना  कोणत्या घटकांवर भर द्यावा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, वेळेचे नियोजन म्हणजेच कोणत्या प्रश्नांना किती वेळ द्यावा, उत्तरे कशी लिहावीत, प्रश्नपत्रिकेतील कोणत्या प्रश्नांवर जास्तीत जास्त भर द्यावा इत्यादी गोष्टींचे मार्गदर्शन केले आहे. या मार्गदर्शनाचा तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी नक्कीच उपयोग होईल, अशी आशा आम्हाला वाटते.

या व्याख्यानमालेत डॉ. अ. ल. देशमुख (परीक्षेचे मानसशास्त्र) , स्मिता ओव्हाळ (मराठी), स्नेहल काटदरे (हिंदी), संतोष खताळ (इंग्रजी), माधव भुस्कुटे (संस्कृत), शिवानी बोपर्डीकर (गणित एक), मनोज उल्हे (गणित दोन), पूर्वा अनासपुरे (विज्ञान एक), डॉ. अ. ल. देशमुख (विज्ञान दोन), शिवानी लिमये (इतिहास), स्मिता करंदीकर (भूगोल) हे नामवंत, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी mpcnews.in ला भेट द्या तसेच ‘एमपीसी न्यूज शिक्षण संवाद’ या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा एमपीसी न्यूज शिक्षण संवाद केजी टू पीजी’ हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप खूप शुभेच्छा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.